न्यू खलाशी लाईन येथे 43 हजार रुपयांची घरफोडी

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या न्यू खलाशी लाईन येथे एका कुलुपबंद घरात चोरट्यानी घरात अवैधरित्या प्रवेश करून घरातील लोखंडी कपाटात सुरक्षित ठेवलेले नगदी 31 हजार रुपये व एक सोन्याची साखळी असा एकूण 43 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून पसार झाल्याची घटना सकाळी सात वाजता निदर्शनास आली असून यासंदर्भात फिर्यादी संदीप अरुण मेश्राम ने पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर फिर्यादी हे घरमंडळीसह बाहेरगावी गेले असता घरात कुणी नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने दाराचा कुलूप तोडून घरात अवैधरित्या प्रवेश करून घरातील नगदी 31 हजार रुपये व सोन्याची साखळी चोरी करून पसार झाले.पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कामठीत गळफास लावून आत्महत्या.

Mon Mar 11 , 2024
    Follow us on Social Media x facebook instagram

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights