नागपूर :- नवेगाव (कवडस) निवासी संदीप अशोक शेवडे (40) हा हिंगणी कवडस मार्गावरून नवेगाव ला येत असताना पेंढ्री घाटाजवळ रोडच्या मध्ये उभ्या असलेल्या ट्रकवर आढळून जागीच ठार झाला. हिंगणा पोलिसांनी मृतक संदीप चे वडील नागपूर निवासी अशोक नुसाजी शेवडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून MH 04 -HY 6214 च्या ट्रक चालकावर भादवी 283 व 304 ए अंतर्गत गुन्हा दाखल केला.
संदीप शेवडे हा चाळीस वर्षीय तरुण अविवाहित असून तो नवेगाव येथे अनेक वर्षापासून इंदू नावाच्या आपल्या आई सोबत वडिलांपासून विभक्त राहायचा.
काल 23 मे रोजी संदीप आपल्या एम एच 31 बी वाय 70 56 या पल्सर गाडीने पेंढरी घाटाकडून आपल्या घरी नवेगावकडे येत असताना रात्री आठच्या दरम्यान त्याचा अपघात झाला.
एम एच 4, एच वाय 6214 हा कंटेनर मालवाहक ट्रक रस्त्याच्या मधोमध उभा होता. या ट्रकचे कुठलेही इंडिकेटर सुरू नव्हते. किंवा या ट्रकमुळे कुणाचा अपघात होऊ नये म्हणून त्याच्या आजूबाजूला कुठेही अडथळे निर्माण केले नव्हते. त्यामुळे रात्रीच्या वेळेस संदीपच्या बाईकची धडक बसून त्याचा जागीच मृत्यू झाला.
आज नवेगाव येथे त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आला. सदर अपघात प्रकरणाची सखोल चौकशी करून रोडच्या मध्ये निष्काळजीपणे ट्रक उभा करणाऱ्या दोशी ट्रक चालकावर कठोर कारवाई करावी व निराधार झालेल्या संदीपची आई इंदुबाईला आर्थिक मदत मिळवून द्यावी असे आवाहन मृतक संदीप चे काका व महाराष्ट्र प्रदेश बसपा चे नेते उत्तम शेवडे यांनी केले आहे.