कन्हान येथे शिवसेना (उद्धव ठाकरे) कार्यालयात स्त्री शक्ती संवाद यात्रा शुभारंभ 

– न पचणाऱ्यांना जास्त दिलं म्हणुन पचलं नाही : किशोरी  पेडणेकर

कन्हान :- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेते व माजी महापौर किशोरी पेडणेकर स्त्री शक्ती संवाद यात्रा निमित्त विदर्भ दौऱ्यावर असतांना रामटेक विधानसभेतील कन्हान येथील तारसा रोड कन्हान (उद्धव ठाकरे) शिवसेना पक्ष जनसंपर्क कार्यलयात बुधवार दि. 17 जनवरीला स्त्री शक्ती संवाद यात्रेचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी पेडणेकर यांनी उपस्थित कार्यकर्ते व पदाधिकारी यांना मार्गदर्शना व्यक्त बाळासाहेबांनी व उद्धव ठाकरे सोडून गेलेल्यांना भरभरून दिलं, विश्वास केला, खाली बसत असलेल्याना खुर्चीत बसवले, आपलं समजून तोंड भरवले पण काहींना जास्त दिल्यामुळे पचलं नाही.परंतु सच्चा शिवसैनिक आपल्या आजही मोठ्या संख्येने सोबत आहे.पुढे होणाऱ्या सर्व निवडणुकीत शिवसेना काय आहे ते सर्व दाखवून देतील. असे मनोगत व्यक्त केले.

यावेळी उपस्थित सर्व महिला भगिनींना मकरसंक्रातीच्या शुभेच्छा देऊन उद्धव ठाकरे पाठीशी खंबीरतेने उभे रहा असे आवाहन केले.

यावेळी या बैठकीला प्रामुख्याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेते रंजना नेवाळकर, रामटेक विधानसभा प्रमुख विशाल बरबटे, पूर्व विदर्भ महिला संघटक शिल्पा बोडके,रामटेक लोकसभा महिला संपर्क प्रमुख मंदाकिनी भावे, लोकसभा सहसंपर्क प्रमुख उत्तम कापसे,महिला जिल्हा प्रमुख वंदना लोणकर, माजी जिल्हा प्रमुख अलका दलाल,तालुका प्रमुख,कैलास खंडार,रामटेक विधानसभा संघटक दुर्गा कोचे, कन्हान न.प नगरसेविका मोनिका पौनीकर,रामटेक तालुका महिला प्रमुख कला तिवारी,तालुका संघटका प्रमिला लोखंडे, मनसर ग्राम पंचायत माजी सरपंच योगीश्वरी चोखांद्रे, मोकरकर ,वैशाली खंडार, ललिता शर्मा,माया नामदिवे, उषा साखोरे, पुष्पा कारेमोरे,माजी ग्रा.प.सदस्य संगीत पंधराम,रजनी परसमोळे शिल्पा मडावी,सह मोठ्या संख्येने महिला शिवसैनिक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मनपा, दपूम रेल्वेचा विजय, खासदार क्रीडा महोत्सव : लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा

Thu Jan 18 , 2024
नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूर शहरात सुरू असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये नागपूर महानगरपालिका आणि दक्षिण पूर्व मध्य रेल्वे संघाने प्रतिस्पर्धी संघांना पराभूत करीत विजय मिळविला. डब्ल्यूसीएल मैदानात सुरू असलेल्या स्पर्धेमध्ये बुधवारी (ता.17) मनपा संघाची लढत एमएसआरटीसी संघाशी झाली. या सामन्यात मनपा संघाने 7 गड्यांनी विजय मिळविला. प्रथम फलंदाजी करणा-या एमएसआरटीसी संघाने निर्धारित […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com