सी-२० पाहुण्यांसाठी मनपाच्या विद्यार्थ्यांचे स्वागत नृत्य, नोबल पुरस्कार प्राप्त कैलाश सत्यार्थींनी केले कौतुक

नागपूर :- नागपूर शहरात सुरू झालेल्या जी-२० शिखर परिषदेच्या नागरी संस्था अर्थात सी-२० बैठकांसाठी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत नागपूर विमानतळ येथे नागपूर महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांनी स्वागत नृत्य सादर करून केले.

सोमवारी (ता.२०) नागरी संस्थांच्या बैठकीच्या उद्घाटनासाठी नोबल पारितोषिक विजेते कैलाश सत्यार्थी यांचे शहरात आगमन झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सत्यार्थी यांचे मनपाच्या विद्यार्थ्यांनी स्वागत नृत्य सादर करून स्वागत केले. यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मनपा शिक्षणाधिकारी राजेंद्र पुसेकर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, कला दिग्दर्शक रूपेश पवार, नृत्य दिग्दर्शक साक्षी गायधने उपस्थित होते.

नागपूर शहरात सोमवार २० मार्चपासून नागरी संस्थांच्या बैठकीला सुरूवात झाली. या बैठकीच्या अनुषंगाने नागपूर शहरात रविवारपासूनच जी-२० सदस्य देशांसह आमंत्रित देशांतील मान्यवरांचे आगमन होत आहे. शहरात येणा-या या विदेशी पाहुण्यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात येत आहे. यात नागपूर महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांकडून देशाच्या विविध भागातील संस्कृती आणि परंपरांचे दर्शन घडविणारे नृत्य सादर करून स्वागत केले जात आहे.

देशाच्या विविध भागातील संस्कृती आणि परंपरा दर्शविणारी वेशभूषा आणि त्यानुसार ‘त्या’ राज्यातील नृत्याचे सादरीकरण करून येणा-या पाहुण्याचे मनपाच्या विद्यार्थ्यांनी स्वागत केले. पाहुण्यांचे स्वागत करणा-या चिमुकल्यांचे  कैलाश सत्यार्थी यांनी कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सी-२० सदस्यांसाठी आयोजित प्रदर्शनात भारतीय संस्कृती व कलेचे दर्शन

Tue Mar 21 , 2023
महाराष्ट्राची टसर सिल्क साडी, गोंडी पेंटींग व बांबूची उत्पादने लक्षवेधक नागपूर :-  जी-२० ट्वेंटी अंतर्गत सिव्हिल सोसायटीची (सी-20) परिषद सुरू असलेल्या रेडिसन ब्लू येथे लावलेल्या हस्तकला वस्तुंच्या प्रदर्शनातून विदेशी पाहुण्यांना भारतीय संस्कृती व कलेचे दर्शन घडत आहे. या प्रदर्शनातील 11 पैकी 8 स्टॉल महाराष्ट्राच्या विविध विभागाचे आहेत. या स्टॉलवर सिव्हील सोसायटीच्या सदस्यांनी विविध वस्तुंची खरेदी करत या सांस्कृतिक कलेची औत्सुक्याने […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com