जबरी संभोग करणाऱ्या आरोपीस अटक

नागपूर :- पोलीस ठाणे सक्करदरा हद्दीत राहणारी १७ वर्षीय अल्पवयीन फिर्यादी मुलगी हिचा परिचित आरोपी नामे अक्षय भैसारे याने फिर्यादीस वारंवार फोन करून भेटण्याचा आग्रह केल्याने फिर्यादी ही दि. १७.०२.२०२४ रोजी १३. ०० वा. पो. ठाणे सिताबर्डी हद्दीत इटर्निटी मॉल समोर येवुन आरोपीस भेटली. आरोपीने फिर्यादी मुलीस ऑटोरिक्षामध्ये बसवून वाडी हद्दीत अनोळखी ठिकाणी एका घरामध्ये नेवून, फिर्यादीचे ईच्छेविरूद्ध, तिचेसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित फेले फिर्यादी हिने दिलेल्या तक्रारीवरून, पोलीस ठाणे सिताबर्डी येथे आरोपी विरूध्द कलम ३४२, ३६३, ३६६(अ), ३७६ भा.द.वि. सहकलम ४, ८, १२ पोक्सो कायदान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सिताबर्डी पोलीसांनी गुन्हयाची गंभीरता लक्षात घेवुन, आरोपीबाबत माहीती काडून, गुन्हयातील आरोपी याचेवर सापळा रचून, आरोपी नामे अक्षय विनोद भैसारे, वय २५ वर्षे, रा. गौतम नगर, बेझनबाग, ख्रिश्चन कॉलोनी, जरीपटका यास ताब्यात घेवुन अटक केली आहे. आरोपीचे ताब्यातुन आंटी किमत २,००,०००/-रु. या जप्त करण्यात आलेला आहे. पुढील तपास सुरू आहे.

वरील कामगिरी पोलीस उप आयुक्त परि क. १, सहा पोलीस आयुक्त सिताबर्डी विभाग यांचे मार्गदर्शनाखाली वपोनि चोरमले, मसपोनि वंजारी, सपोनि बेडवाल, पोउपनि तिवारी, पोहवा, त्रिपाठी, तसलीकर, पोअ रंभापुरे, मांडवगडे व वाडीया यांनी केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नागपूर शहर पोलीसांची दारूबंदी, जुगार, इंकन ड्राईव्ह कायदा अंतर्गत करण्यात आलेली कारवाई

Mon Feb 26 , 2024
नागपूर :- शहर पोलीसांनी पोलीस ठाणे हद्दीत महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये ०७ केस व एन डी.पी.एस. कायद्यान्वये ०१ केस असे एकुण ०८ केसेसमध्ये एकुण ०७ ईसमावर कारवाई करून रू. ९३,०५०/- वा मुद्देमाल जप्त करण्यात आला तसेच, जुगार कायद्यान्यये ०३ केसमध्ये ०६ ईसमावर कारवाई करून रु. ४५,९८०/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वाहतुक शाखा पोलीसांनी मोटार वाहन कायद्यान्वये विविध कलमांखाली एकुण ३.६९३ […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com