माहिती अधिकार दिनानिमित्त  आज चर्चासत्राचे आयोजन

नागपूर :- माहिती अधिकार दिनानिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालय (नागपूर-अमरावती विभाग) आणि पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडिया नागपूर चॅप्टर यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या (दि.28) एक दिवसीय विशेष कार्यक्रमाचे आयोजन रविभवन, सिव्हिल लाइन्स नागपूर येथील कॉन्फरन्स हॉलमध्ये सायंकाळी साडेसहाला करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे तर विशेष अतिथी म्हणून डॉ. नवीन अग्रवाल प्रमाणित माहिती अधिकार प्रशिक्षक उपस्थित राहणार आहेत. ‘माहितीच्या अधिकाराचे फायदे आणि तोटे’ या विषयावरील संवादात्मक सत्रात ते उपस्थितांना मार्गदर्शन करतील. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून माहिती संचालक हेमराज बागुल असतील.

जिल्हा महिती अधिकारी प्रवीण टाके, अनिल गडेकर तसेच कार्यक्रमाचे समन्वयक मनीष सोनी, सत्येंद्र प्रसाद सिंग व यशवंत मोहिते यांनी कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com