राशन काळाबाजारीच्या विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन

नागपूर :- राष्ट्रवादी काँग्रेस नागपूर शहर तर्फे आज २७ सप्टेंबरला अन्न व पुरवठा मुख्य कार्यालय सिव्हिल लाईन येथे नागपुरात मोठ्या प्रमाणात अन्नधान्याची कालाबाजारी होत असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे धरणा प्रदर्शन व नारे निदर्शने करून शहर अध्यक्ष दुनेश्र्वर पेठे यांनी त्यांच्या अधिकारी भेंडे  यांना निवेदन देण्यात आले.

गरीब राशनकार्ड धारक स्वस्त सरकारी अन्न धान्यावर निर्भर आहे. त्यांच्या हक्काचा धान्याची शहरातील महल, दसरा, अशोक चौक, नंदनवन, किडा चौक, मोहन किराणा खरबी, हिवरी से-आऊट, यशोधरा नगर, पाचपावली, वनदेवी नगर, पारडी इत्यादी भागात प्रशासनाचा वरदस्ताने सर्रास काळाबाजारी सुरू आहे.

अन्नपुरवठा विभागाचा स्कॉड सकिय नसल्याने काळाबाजारीचे प्रमाण वाढले आहे. आतापर्यंत झालेल्या कार्यवाही पोलिस विभागाने केल्याचे निर्दशनास येत आहे . त्यामुळे अन्न विभागाचे भरारी पथक सक्रिय करणे आवश्यक आहे. यावर शहर पुरवठा अधिकारी भेंडे यांनी सांगितले की काही दिवसापासून अन्नपुरवठा विभागातील स्कॉड शासनाने बंद केले आहेत. त्यामुळे भरारी पथक पुन्हा कार्यावित करण्यासाठी शासनाला कळविले आहे. तसेच लवकरच काळाबाजार थांबविण्यासाठी आवश्यक ते उपाय उचलले जाईल अशी आश्वासन राष्ट्रवादीच्या शिष्टमंडलला रमेश भेंडे यांनी दिले.

शहर अध्यक्ष पेठे यांनी झोनल अधिकारी व पुरवठा निरीक्षक बरेच वर्षापासून एकाच ठिकाणी कार्यरत असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यामुळे भ्रष्टाचाराला खतपाणी प्रशासनाद्वारा घातली जात आहे असा आरोप पेठे यांनी केले

यावेळी जानबा मस्के, रमण ठवकर, लक्ष्मी सावरकर, शैलेंद्र तिवारी, सतीश इटकेलवार, संतोष सिंह, शिव बेंडे, रिजवान अंसारी, सुखदेव वंजारी, विशाल खांडेकर, राजा बेग, राजेश पाटील, अश्विन जवेरी, मोरेश्वर जाधव, प्रमिला टेंभेकर, तनुज चौबे, अमीत पिचकाटे, निलेश बोरकर, जुबेर कबीर, सय्यद सुफियान, येस बी अहमद, राजेश तिवारी, रेखाताई कृपाले, देवेंद्र घरडे, मंजू लाडेकर, भारतीय गायधने, कादिर शेख, सुकेशनी नारनवरे, धनराज सदावरती, नसीम सिद्धिकी, विजयमाला रामटेके, शेख शाह, अमित जेथे, आकाश चीमनकर, इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते

 

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com