आरोग्य शिबिरात महिलांनी आरोग्य तपासणी करून घ्यावी – डॉ नैना धुमाळे

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- नवरात्री उत्सवानिमित्त कामठी तालुक्यातील 18 वर्षावरील महिला, माता, गरोदर स्त्रिया यांच्या आरोग्य तपासणीसाठी 27 सप्टेंबर पासून ते 30 सप्टेंबर 2022 पर्यंतच्या सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंतच्या कालावधीत कामठी च्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ हे अभियान राबविण्यात येत आहे ज्याचा शुभारंभ आज 27 सप्टेंबर ला करण्यात आला आहे तेव्हा या चार दिवसीय महिलांच्या आरोग्य तपासणी शिबिराचा जास्तीत जास्त महिलांनी सहभाग नोंदवित आरोग्य तपासनी करून घ्यावी असे आवाहन वैद्यकिय अधिक्षिका डॉ. नैना धुमाळे यांनी केले आहे.

या आरोग्य तपासणी शिबिरा अंतर्गत आज 18 वर्षावरील महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली.ज्यामध्ये दंत चिकित्सक, स्त्री रोग तज्ञ, बालरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, शल्य चिकित्सक, कर्करोग, मानसिक आजारच्या वैद्यकीय अधिकारी सह आदींनी वैद्यकीय सेवा पुरविली असून अजून तीन दिवस या आरोग्य शिबिरातून वैद्यकिय सेवा देणार आहेत. तसेच या शिबिरातून आयुष्यमान भारत डिजिटल मशीन अंतर्गत युनिक हेल्थ आयडी कार्ड, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, जननी सुरक्षा योजना, जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम, सोनोग्राफी तपासणी, प्रयोगशाळा तपासणी,एक्स रे, इसीजी सुविधा इत्यादी सह इ संजीवनी सेवांचा लाभ दिला जात आहे. तरी सुद्धा या शिबिराचा 18 वर्षेवरील महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ संजय माने, शासकीय उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षिका डॉ. नैना धुमाळे, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.शबनम खाणुनी आदींनी केली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कामठीतील निर्मल उज्वल बँकेचा ग्राहकाची फसवणुकीचा प्रकार चव्हाट्यावर..

Tue Sep 27 , 2022
संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी  -3 लक्ष रुपयाची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस कामठी ता प्र 27:-स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या प्रसिद्ध उद्योगपती रामेश्वर बावनकर यांच्या बंगल्याच्या बाजूला असलेल्या निर्मल उज्वल क्रेडिट को ऑप सोसायटी ली. नागपूर(मल्टिस्टट) बँकेचे माजी मॅनेजर व बँक कर्मचारी ने एका महिला खातेदाराची दिशाभूल करून विश्वासघात करीत 3 लक्ष रुपयाची आर्थिक फसवणुक केली तर हा प्रकार […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com