कन्हान नदी पात्रात एका दहा वर्षीय बालकाचा मृतदेह आढळला

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- एकीकडे सर्वत्र बालके पळवून नेत असल्याच्या अफवा पसरत आहेत त्यातच आज स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या गादा नेरी मार्गावरील कन्हान नदीच्या पात्रात एक दहा वर्षीय बालक मृतावस्थेत वाहून आल्याची घटना आज सायंकाळी 5 दरम्यान निदर्शनास आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष वैरागडे यासह अन्य पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह नदीबाहेर काढून पुढील उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह नजीकच्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले मृतक बालकाची अजूनही ओळख पटलेली नसून पोलीस विभागाच्या वतीने सदर मृतक बालकाच्या मृतदेहाच्या वर्णनाचे मिसिंग ची नोंद समस्त पोलीस स्टेशन मध्ये शोध घेण्यात येत आहे. पोलिसांनी तूर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

भागो... भागो...शेर... आया...! मुंडीपार क्षेत्र पट्टेरी वाघाचे दर्शन...

Thu Sep 29 , 2022
अमरदिप बडगे, प्रतिनिधी वाघाची दहशत वाढली; भर दिवसा वाघाचे दर्शन मुंडीपार रस्त्यालगत जंगलात गोंदिया –  जिल्ह्यच्या गोरेगाव वनपरिक्षेत्राअंतर्गत मुंडीपार रस्त्यालगतच्या जंगलात भर दिवसा वाघांचे दर्शन होत असल्याने या भागातील नागरिक धास्तावले आहेत. वाघाची दहशत वाढली असल्याने नागरीकानीं घराच्या बाहेर निघावे कसे, असा प्रश्न मुंडीपार गावातील नागरीकांपुढे निर्माण झाला आहे. नागझीरा अभयारन्य गोरेगाव तालुक्याला लागुन असल्याने सतत वाघांचे , बिबटचे दर्शन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights