स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी विशेष आरोग्य शिबीर 

नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी 

सेवा पंधरवाड़ा अंतर्गत मनपाची विशेष शिबिरे

चंद्रपूर :-  महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत नवरात्र उत्सवानिमित्त ” माता सुरक्षित तर घर सुरक्षित ” अभियान दि. २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर पर्यंत राबविले जात असुन याअंतर्गत चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर प्रत्येक झोनमध्ये २७,२८ आणि २९ सप्टेंबर रोजी आयोजीत केले गेले आहे. यात तज्ञ डॉक्टरांमार्फत आरोग्य तपासणी,रक्त व रक्तदाब तपासणी, कोव्हीड १९ लसीकरण,मोफत समुपदेशन व मोफत औषधोपचार केले जाणार आहेत.

स्वच्छतेवर अधिक भर दिला जात असल्याने इतर प्रसंगी, विशेषतः सण समारंभात मनपा स्वच्छता कर्मचाऱ्यांवर अधिक ताण पडतो. अधिक ताण पडल्याने कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर वाईट परीणाम होत आहे तेंव्हा या कर्मचाऱ्यांसाठी विशेष आरोग्य शिबीर झोननिहाय घेण्यात येत आहे. यात स्वच्छता कर्मचाऱ्यांचे आरोग्य तपासणी करून औषधोपचार व समुपदेशन केले जाणार आहे.

सेवा पंधरवडा अंतर्गत चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे प्रत्येक झोन क्षेत्रात विशेष शिबीर लावले जाणार आहे. २७ ते २९ सप्टेंबर दरम्यान हे शिबीर आयोजीत केले जाणार असुन नागरीकांना विविध योजनांच्या सेवा जसे शासनाच्या विविध योजना जसे पंतप्रधान स्वनिधी योजना, प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, एकल खिडकी, विवाह नोंदणी, जन्म – मृत्यु प्रमाणपत्र, मालमत्ता कर,बचतगट कर्ज, दिव्यांग ओळखपत्र, आरोग्य शिबीर, रेन वॉटर हार्वेस्टींग प्रमाणपत्र, नवीन नळ जोडणी इत्यादींशी प्रलंबित प्रकरणांचे निराकरण केले जाणार आहे.

स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी विशेष आरोग्य शिबीर, नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी व सेवा पंधरवाड़ा अंतर्गत मनपाची शिबिरे एकाच दिवशी व एकाच ठिकाणी आयोजीत करण्यात आली असुन २७ सप्टेंबर रोजी झोन १ चे शिबीर स्वातंत्र्यवीर सावरकर व्यायामशाळा, डॉ. धांडे हॉस्पीटल जवळ, तुकुम येथे, झोन २चे शिबीर २८ सप्टेंबर रोजी आझाद गार्डन येथे तर झोन ३ चे शिबीर २९ सप्टेंबर रोजी झोन ३ कार्यालय परिसरात आयोजीत केले गेले आहे. या विशेष शिबिरात सर्व नागरीकांनी सहभागी होऊन लाभ घेण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

स्वच्छ भारत अभियान : प्लास्टिक विरुध्द मनपाची कारवाई

Tue Sep 27 , 2022
नागपूर :-  स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सोमवारी (ता.26) 06 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 76 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक  राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात नेहरुनगर, गांधीबाग, सतरंजीपूरा आणि लकडगंज झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 4 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 20,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 8 किलो प्लास्टिक जप्त करण्यात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com