चंद्रपूर :- स्वच्छता व सौंदर्यीकरण लीग स्पर्धेअंतर्गत ३० नोव्हेंबरपर्यंत प्रभागातील ५ हजार नागरिकांपर्यंत स्वच्छतेचा संदेश पोहचविण्याचे उद्दिष्ट राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छता मंडळाने ठेवले आहे. चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे स्वच्छ भारत अभियान अंतर्गत लोकसहभागातुन चंद्रपूर शहर ” स्वच्छता व सौंदर्यीकरण लीग स्पर्धेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छता मंडळ सहभागी असून स्पर्धेअंतर्गत, माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार यांच्या नेतृत्वात तुकुम प्रभागात स्वच्छता अभियान राबविल्या जात आहे.  […]

नागपूर : प्रतापनगर शिक्षण संस्थेच्या सुवर्ण जयंती वर्षा निमित्ताने प्रतापनगर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालया तर्फे सोमवारी समर्थ व्यायाम शाळेच्या मैदानावर जिल्हास्तरीय आंतरशालेय व्हाॅलीबॉल स्पर्धेचे सफल आयोजन करण्यात आले. स्पर्धेत एकूण २५ संघाने सहभाग नोंदवला. सकाळी उद्घाटनीय कार्यक्रमात समाजसेवक विनय आंबुलकर यांच्या हस्ते स्पर्धेचे रीतसर फीत कापून उद्घाटन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला प्रमुख अतिथी छत्रपती पुरस्कार विजेते पियुष आंबुलकर, राज्य हॉलीबॉल […]

मुंबई :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात ‘ग्रंथोत्सव’ या विषयावर ग्रंथालय संचालक दत्तात्रय क्षीरसागर यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवर बुधवार दि. 23 व गुरुवार दि. 24 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. शासनाच्या ग्रंथालय संचालनालयामार्फत ग्रामीण व शहरी भागातील […]

कर्मयोगी प्रारंभ प्रारुपाचा केला शुभारंभ- नवीन नियुक्तींसाठी ऑनलाइन अभिमुखता अभ्यासक्रम नागपूर आणि पुण्यासह देशभरात 43 ठिकाणी उमेदवारांना प्रत्यक्ष नियुक्तीपत्रे वितरित करण्यात आली केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते, नोकरी मिळालेल्या उमेदवारांना पुण्यात नियुक्तीपत्रांचे वितरण मुंबई :- रोजगार मेळाव्या अंतर्गत नव्याने भर्ती झालेल्या सुमारे 71,000 जणांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून नियुक्तीपत्रांचे वितरण केले. रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी, […]

लोकसंख्येची अट रद्द : गावामध्ये एकाच वेळी कितीही विहिरींची कामे सुरू करणे शक्य पारशिवनी :-पारशिवनी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने (नरेगा) अंतर्गत सिंचन विहीरी बाबद. महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे .दोन विहिरीतील अंतराची अट शिथिल केली असून दुसरा महत्वपूर्ण निर्णय म्हणजे तीन लाखांवरून चार लाख रुपये रक्कम मंजूर करण्यात आली. विशेष म्हणजे एका गावात कितीही विहीरी घेता येणार आहे. […]

नागपूर :- (MELODY TALKS )मेलोडी टॉक्स प्रस्तुत..युट्युबर पॉपुलर सेलिब्रिटी विनायक माळी येत्या 9 डिसेंबरला नागपूर शहरात आमच्या मेलोडी टॉक्स प्रोटेक्शन या बॅनरखाली महाराष्ट्राच्या टॉक्स मोस्ट युट्युब व इंस्टाग्राम च्या मेळाव्याचे आयोजन दिनांक. 9 डिसेंबर 2022 रोजी, फुटाळा तलाव डी.सी.लॉन येथे आयोजित करण्यात आले आहे. मेलोडी टॉक्स प्रोडक्शन द्वारा आयोजित महाराष्ट्राच्या मोस्ट पॉप्युलर युट्युबर इंस्टाग्राम निर्माते पहिल्यांदाच नागपुरात येणार असून या […]

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नागपूरकरांना मोठा दिलासा मुंबई :- नागपूर शहरात बांधकाम परवानगीसाठी विकास शुल्कात 100 टक्के वाढ करण्याचा स्थानिक प्रशासकीय पातळीवरील निर्णय रद्द करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. नागपूरच्या विविध प्रश्नांवर काल मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. या निर्णयामुळे नागपूरकर जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे. महापालिका सभागृहाची मान्यता नसताना प्रशासकीय पातळीवर हा […]

भंडारा :- भंडारा जिल्ह्याचे नवीन जिल्हाधिकारी म्हणून योगेश विजय कुंभेजकर (आयएएस) यांनी आज दिनांक 22 नोव्हेंबर 2022 रोजी जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला. कुंभुजकर यांनी आयआयटी, मुंबई मधून बी. टेक ची पदवी प्राप्त केली असून त्यांनी सन 2018 ते 2020 या कालावधीत उपविभागीय अधिकारी तथा प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर या पदाचा कार्यभार सांभाळलेला आहे. दिनांक 13 एप्रिल 2020 रोजी […]

अमरावती :-  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथे 3 ते 07 डिसेंबर दरम्यान होणा-या 24 व्या महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ स्पोर्टस् मिट क्रीडा महोत्सव -2022 कबड्डी (पुरुष) स्पर्धेकरीता संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा पुरुष संघ घोषित झाला असून खेळाडूंचे प्रशिक्षण शिबीर डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावती येथे होणार आहे. खेळाडूंमध्ये संत गाडगे महाराज महाविद्यालय, वलगावचा आदेश वानखडे, अजय […]

मुंबई :- बारसू तेल शुद्धीकरण प्रकल्पाच्या भूसंपादनाचे काम स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन करत असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज सांगितले. रत्नागिरी येथील बारसू या गावात सुरु होत असलेल्या तेल शुद्धीकरण प्रकल्पासंदर्भात आज महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यासंदर्भातील माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत उद्योगमंत्री उदय सामंत बोलत होते. या तेल शुद्धीकरण प्रकल्पाबाबत उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक घेण्यात […]

मुंबई :- डेन्मार्क जगातील आघाडीचा दुग्ध उत्पादक देश असून आपल्या देशाने भारताला दुग्ध क्रांती घडवून आणण्यात मदत केली आहे. डेन्मार्क भारतातील अनेक राज्यांना कृषी व पर्यावरण संवर्धन क्षेत्रात सहकार्य करीत असून लवकरच महाराष्ट्रात दुग्ध उत्पादनातील ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ स्थापन करणार असल्याची माहिती डेन्मार्कचे भारतातील राजदूत फ्रेडी स्वेन यांनी आज येथे दिली. फ्रेडी स्वेन यांनी मंगळवारी (दि. २२) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी […]

नागपूर :-मंगळवार 22 नोव्हेंबर रोजी ग्रुप सेंटर, CRPF नागपूर येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये भारत सरकारच्या CISF, BSF, SSB, आसाम रायफल, NCC रेल्वे, भारतीय खाण ब्युरो, इन्कमटॅक्स, भौगोलिक सर्वेक्षण, एम्स, कॅनरा बँक, युको बँक, बॅक ऑफ बडोदा, ईएसआईसी, पोस्ट मध्ये निवडल्या गेले. यांसारख्या विविध कार्यालयांमध्ये एकूण 193 उमेदवारांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी सर्वचपोस्टने भाग घेतला होता. […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- कामठी तालुक्यांतर्गत येणाऱ्या म्हसाळा येथील पौजेपीन्स एकडेमी शाळेजवळ एका स्कुल बसच्या धडकेने 8 व्या वर्गात शिकणाऱ्या एका 12 वर्षीय विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी अडीच दरम्यान घडली असून मृतक बालकाचे नाव समेश दिनेश कदमते असे आहे.   प्राप्त माहितीनुसार नेहमीप्रणाने दुपारी 2 नंतर शाळेला सुट्टी झाल्यानंतर बसच्या प्रतीक्षेत रस्त्याच्या कडेला विद्यार्थी उभे […]

नागपूर : भारतीय विज्ञान परिषदेचे ( इंडियन सायन्स काँग्रेस ) 108 वे आयोजन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या यजमानपदाखाली 3 ते 7 जानेवारी या कालावधीत विद्यापीठ परिसरात होणार आहे. विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आज यासंदर्भातील आढावा घेण्यात आला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. 1914 मध्ये भारतात विज्ञान तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी कोलकत्ता येथे पहिल्या भारतीय विज्ञान परिषदेचे आयोजन करण्यात […]

३ नागरीकांना मिळाले भुखंड / बांधकाम नियमित करणाचे पत्र चंद्रपूर : – महाराष्ट्र गुंठेवारी विकास ( नियमाधीन करणे,श्रेणीवाढ व नियंत्रण ) अधिनियम २००१ अंतर्गत शहरातील ३१ डिसेंबर २०२० पूर्वीची अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी चंद्रपूर महापालिका नगररचना विभागामार्फत अर्ज स्वीकारले जात आहेत. मौजा देवई गोविंदपुर येथील १०७/५६ अ, वडगाव येथील सर्वे नंबर ५२/१,५२/२,४५/१ क,१६/१ पैकी,१५/१ अ,१८, ८१/३,१८ पैकी,४५/१अ १६/१,१७ चे अभिन्यास […]

अमरदिप बडगे, प्रतिनिधी गोंदिया :- जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील नवेझरी येथील जी.ई. एस.हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय सायबर क्राईम बदल मार्गदर्शन करण्यात आले यावेळी के.वाय.सी फ्रॉड , स्क्रीन शेअर फ्राड, ओएलएक्स फ्राड , केबीसी फ्राड ,लोन , गुगल कस्टमर केअर फ्राड ,फेसबुक प्रोफाईल फ्राड, ॲमेझॉन फ्राड ,व्हाट्सअप व्हिडिओ सेक्सटॉर्षण, कस्टम गिफ्ट फ्राड ,मॅट्रिमोनीयल फ्राड पोलीस अधीक्षक गोंदिया यांच्या जनजागृती संदेश इत्यादींवर विस्तृत […]

नागपूर : इयत्ता 10 वी व इयत्ता 12 वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी- मार्च 2023 च्या परीक्षेस खाजगीरीत्या प्रविष्ट होणा-या विद्यार्थ्यांचे नावनोंदणी अर्ज ऑनलाईन पध्दतीने स्वीकारण्यात येतात. सदर अर्ज विलंब व अति विलंब शुल्काने स्विकारण्याचा कालावधी 1 सप्टेबर ते 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत मुदतवाढीने निश्चित करण्यात आला होता. सदर अर्ज करण्यास 25 नोव्हेंबर 2022 पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात येत आहे. माध्यमिक […]

मुंबई :- भारतीय संस्कृती चिरपुरतान – नित्यनूतन असून युरोपमधील पुनर्जागरणाप्रमाणे (Renaissance) आज भारतीय पुनर्जागरण होत आहे. अश्यावेळी भारतीय संस्कृती व सभ्यतेचा प्रचार प्रसार कसा होईल या दृष्टीने प्रयत्न झाले पाहिजे, असे सांगताना काशी व अयोध्येच्या पुनरुत्थाना प्रमाणेच राज्यात देखील पंचवटी – त्र्यंबकेश्वर कॉरिडॉर विकसित व्हावा, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.      केंद्रीय शिक्षण मंत्रालय भारत […]

मुंबई :- गुजरात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये राज्यातील पालघर, नाशिक, नंदुरबार व धुळे जिल्ह्यातील ज्यांची नावे गुजरात राज्यातील मतदार यादीमध्ये समाविष्ट आहेत, अशा मतदारांना मतदानासाठी सुट्टी देण्याचा आदेश उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने जारी केला आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीकरिता 1 व 5 डिसेंबर 2022 रोजी मतदान घेतले जाणार आहे. या निवडणुकीमध्ये ज्यांची नावे गुजरात राज्यातील मतदार यादीमध्ये समाविष्ट आहेत, अशा मतदारांना […]

मुंबई :- महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सर्व राज्यांतून आलेल्या सूचनांचा समावेश करुन सर्वसमावेशक धोरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना सादर करणार असे, केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाचे सचिव इंदेवर पांडे यांनी सांगितले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली दि.५ ते ७ जानेवारी २०२३ दरम्यान देशातील सर्व राज्यांचे मुख्य सचिव यांची 7 वी राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात येणार आहे. या परिषदेची पूर्वतयारीसंदर्भात सह्याद्री अतिथीगृह […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com