गुंठेवारी अंतर्गत प्रकरणे नियमित करण्याचे काम प्रगतीपथावर

३ नागरीकांना मिळाले भुखंड / बांधकाम नियमित करणाचे पत्र

चंद्रपूर : – महाराष्ट्र गुंठेवारी विकास ( नियमाधीन करणे,श्रेणीवाढ व नियंत्रण ) अधिनियम २००१ अंतर्गत शहरातील ३१ डिसेंबर २०२० पूर्वीची अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी चंद्रपूर महापालिका नगररचना विभागामार्फत अर्ज स्वीकारले जात आहेत.

मौजा देवई गोविंदपुर येथील १०७/५६ अ, वडगाव येथील सर्वे नंबर ५२/१,५२/२,४५/१ क,१६/१ पैकी,१५/१ अ,१८, ८१/३,१८ पैकी,४५/१अ १६/१,१७ चे अभिन्यास मंजुर झालेले आहेत. मौजा वडगाव सर्वे नंबर १९,४२,४४,४९,५० व मौजा दे.गो.रे १०७/१ चे अभिन्यास एजंसीकडे दुरुस्तीकरीता देण्यात आले आहे व मौजा चांदा रे. सर्व्हे नंबर ४९,५०,५१ व ५३ ची भुमि अभिलेख, चंद्रपूर यांचेकडील मोजणी ‘ क ‘ प्रत प्राप्त झालेली असुन एजंसीकडे अभिन्यास नकाशे तयार करण्याचे काम सुरु आहे.

या कालावधीत उपरोक्त सर्व्हे नंबर मधील जे अर्ज मनपास प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ३ लोकांना बांधकाम / भूखंड नियमित केल्याचे प्रमाणपत्र दिलेले आहेत व उर्वरित अर्जांवर प्रत्यक्ष कार्यवाही प्रगतीपथावर आहे. त्यानुसार पुढील काळात लवकरात लवकर कारवाई करून पात्र अर्जदारांना गुंठेवारीअंतर्गत बांधकामे नियमित केल्याचे प्रमाणपत्र दिली जाणार आहेत, असे मनपा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

मौजा वडगाव येथील सर्वे नंबर १८, १८ पैकी व १६/१,१७ मंजुर अभिन्यासामधील महेंद्र पांडुरंग जारी, मनोज लक्ष्मण आपटे,पुरुषोत्तम बाजीराव चामाटे यांना १५ नोव्हेंबर, २०२२ रोजी भुखंड / बांधकाम नियमित करणाचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे.

उपरोक्त मंजूर अभिन्यासामधीलअनधिकृत भुखंड / बांधकाम धारकांनी भुखंड / बांधकाम नियमानुकुल करण्याबाबत अर्ज मनपा कार्यालयास सादर केला नसल्यास त्वरीत अर्ज सादर करावा. तसेच त्रुटींची पुर्तता करण्याबाबत मनपा कार्यालयातुन कळविण्यात आले असल्यास ७ दिवसांच्या आत कागदपत्रांची / त्रुटींची पुर्तता करून घ्यावी अन्यथा सदर भुखंड / बांधकामावर महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९९६ नुसार निष्कासनाची कार्यवाही प्रस्तावित करण्यात येणार असल्याचे चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नागपूरमध्ये 108 वी 'इंडियन सायन्स काँग्रेस' जानेवारीमध्ये , नागपूर विद्यापीठात प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन

Tue Nov 22 , 2022
नागपूर : भारतीय विज्ञान परिषदेचे ( इंडियन सायन्स काँग्रेस ) 108 वे आयोजन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या यजमानपदाखाली 3 ते 7 जानेवारी या कालावधीत विद्यापीठ परिसरात होणार आहे. विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आज यासंदर्भातील आढावा घेण्यात आला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. 1914 मध्ये भारतात विज्ञान तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी कोलकत्ता येथे पहिल्या भारतीय विज्ञान परिषदेचे आयोजन करण्यात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights