नागपूर :-जल-जमीन-जंगल चे रक्षक, स्वातंत्र्यासाठी इंग्रजांशी संघर्ष करणारे जननायक क्रांतिवीर बिरसा मुंडा यांची 147 वी जयंती बेसा रोड वरील बनवाडी येथील बिरसा मुंडा यंग फोर्स ने प्रबोधन, सांस्कृतिक कार्यक्रम व सामूहिक गाव भोजन देऊन भव्य प्रमाणात साजरी केली.
![](https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/06/BJP-Half-page_page-0001.jpg)
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आदिवासी विकास सेवा संघाचे आकाश मडावी, गोगपाचे प्रदेशाध्यक्ष राजेश इरपाते, आदिवासी विकास परिषदेचे विवेक नागभिरे, माना समाज समन्वय समितीचे अरविंद सांडेकर, आदिवासी गोवारी समाजाचे भगवान भोंडे, बसपाचे प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे, सामाजिक कार्यकर्ते योगेश टेकाम, मयूर कोवे, अश्विनी कांबळे, समीक्षा तुमडाम पाहुणे म्हणून उपस्थित होते.
![](https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/06/WhatsApp-Image-2024-06-06-at-16.46.34_c08487b5.jpg)
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सदस्य जगदीश पाटील होते. बिरसा मुंडा यांच्या जयंतीचे हे पाचवे वर्ष असून बसपा नेते उत्तम शेवडे हे बनवाडी (बेसा रोड) या गावचे मूळ रहिवासी असल्याने त्यांना यावेळी प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी स्थानिक लहान मोठ्या कलाकारांनी सांस्कृतिक व गोंडी-आदिवासी भाषेतील गीते व नृत्य सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक उईके यांनी तर समापन ऋतिक सलामे यांनी केला.
यावेळी पाहुण्यांनी व आयोजकांनी दलित, आदिवासी, ओबीसी आदी समाजामध्ये बंधुभाव वाढवून त्यांच्यात शिक्षणाची, संस्कृतीची ज्योत पेटवुन ती वृदिंगत करणे हा बिरसा मुंडा ह्या महापुरुषाच्या जयंतीचा उद्देश असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नंदकिशोर उईके, बाबा वलके, रोशन टेकाम, विलास वलके, चरण उईके, स्वप्निल सलाम, मारुती बोटरे, भारत बोटरे, मुकिंदा डडमल, कोठीराम डडमल, इंद्रपाल सलाम, मंगेश झाडे, प्रवीण वडमे, तक्षशील कांबळे, प्रवीण पाटील, राकेश पाटील, सुरज कांबळे, सुदाम उईके, श्रावण उईके, दिनेश वलके, मनोज तुमडाम आदी प्रमुख कार्यकर्ते प्रामुख्याने राबले होते.