सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या 54 प्रकरणांची नोंद, उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. शुक्रवार (26) रोजी शोध पथकाने 54 प्रकरणांची नोंद करून 44700 रुपयाचा दंड वसूल केला.शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु करण्यात आलेली आहे. सार्वजनिक ठिकाणी, रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी थुंकणे या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 200 रुपयांची वसुली करण्यात आली. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत 19 प्रकरणांची नोंद करून 7600 रुपयांची वसुली करण्यात आली. कोणत्याही व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. 100/- दंड) या अंतर्गत 5 प्रकरणांची नोंद करून 500 रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत 3 प्रकरणांची नोंद करून रु 1200 दंड वसूल करण्यात आलेला आहे.वाहतुकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तीक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 5 प्रकरणांची नोंद करून 9000 रुपयांची वसुली करण्यात आली. वै्द्यकिय व्यवसायिकांनी जैव वैद्यकिय कचरा सर्वसाधारण कचऱ्यात टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून रु 15000 दंड वसूल करण्यात आला. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 11 प्रकरणांची नोंद करून रु 2200 दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 9 प्रकरणांची नोंद करून रु 9000 दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

यशवंत स्टेडियम चिटनिस पार्क स्टेडियम का होगा कायापलट, मनपा नियुक्त करेगी सलाहकार, ट्रांसस्टेडिया की तर्ज पर होगा काम

Fri May 26 , 2023
नागपुर :-शहर के खिलाड़ियों के अधिकार के कहे जाने वाले मैदान यशवंत स्टेडियम बिजनेस पार्क इंदु मैदानों का कायापलट करने का निर्णय मनपा ने लिया है इन दोनों मैदानों का विकास अहमदाबाद से मल्टीस्पोर्ट्स खेलों के सुविधाजनक सुविधा वाले ट्रांसस्टेडिया की तर्ज पर किया जाएगा इन दोनों मैदानों का नया डिजाइन व कमर्शियल प्रारूप तैयार करने के लिए सलाहकार नियुक्त […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com