नागपूर :-महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये एका प्रकरणात एका जणाकडून ६६५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जुगार कायद्यान्वये एका जणाकडून १ हजार ७९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
वाहतुक शाखा पोलिसांनी मोटार वाहन कायद्यान्वये विविध कलमांखाली ३ हजार ०७८ वाहन चालकांवर कारवाई केली. त्यांच्याकडून ३ लाख ५७ हजार ४०० रुपये तडजोड शुल्क वसूल करण्यात आले. नागपूर शहर पोलिसांनी वरील सर्व मोहीम एकत्रितरित्या राबविली. या पुढे देखील ही कारवाई प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. परिणामी, वाहन चालकांनी वाहन चालवितांना वाहतुकीचे नियम पाळून वाहनासंबंधी सर्व कागदपत्रे जवळ बाळगावित, असे आवाहन करण्यात आले आहे.