धर्मराज विद्यालयाच्या गुणवंतांचा गौरव

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

– विद्यालयातुन प्रथम आदित्य वासाडे, व्दितीय प्रिन्स शेंडे, तृतीय जयंत काकडे

कन्हान :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमि क शिक्षण मंडळ, पुणे व्दारे माध्यमिक शालांत प्रमाण पत्र ( इ.१० वी ) मार्च २०२४ च्या परीक्षेत धर्मराज विद्यालय कांद्री-कन्हान चा ९७.३९ टक्के निकाल लागल्याने शाळेतील गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार करून गौरव करण्यात आला.

मंडळामार्फत घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत धर्मराज विद्यालय कांद्री- कन्हान चे २३० विद्यार्थी परिक्षेत बसले असुन प्राविण्य सुचित ५१ विद्यार्थी, प्रथम क्षेणीत ८६, व्दितीय क्षेणीत ६९ विद्यार्थी, पास क्षेणीत १८ तर ०६ विद्यार्थी अनु उर्त्तीण झाले असुन २२४ विद्यार्थी उर्त्तीण झाल्याने शाळेचा ९७.३९ % निकाल लागला. यात विद्यालया तुन प्रथम आदित्य किशोर वासाडे ९१.८० %, व्दितीय प्रिन्स नरेश शेंडे ९०.२० % तर तृतीय जयंत मुनेश्वर काकडे ८९.८०% तर चतुर्थ क्रमाक ८९.६०% गुण प्राप्त करून प्रविण्य प्राप्त करून उर्तीण झाल्याने सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष खुशालराव पाहुणे तथा शाळेच्या मुख्याध्यापिका संध्या तिळगुळे, सेवानिवृत्त शिक्षक सुनिल लाडेकर, मोहन भेलकर, विलास डाखोळे, अनिल मंगर, हरिश पोटभरे, सतिश राऊत, नरेंद्र कडवे, अमित मेंघरे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करित अभिनंदन केले. या प्रसंगी विद्यार्थ्यांचे पालक किशोर वासाडे, नरेश शेंडे, मुनेश्वर काकडे, संतोष पाहुणे व शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद प्रामुखाने उपस्थित होते.

१) विद्यार्थ्याचा गौरव करताना ग्रुप फोटो.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मुक्या वृद्ध महिलेला पोलिसांनी सुखरूप पोहचवले घरी

Tue May 28 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कामठी बस स्टँड चौकातील पटेल न्यूज पेपर एजन्सी जवळ मुकी दिव्यांग असलेली एक वृद्ध महिला भरकटलेल्या स्थितीत आज सकाळी 9 वाजेदरम्यान आढळली असता पोलिसांनी वेळीच तर्कशक्तीच्या आधारावर सदर वृद्ध महिलेच्या घरचा पत्ता शोधून तिला सुखरूप घरी पोहोचवून माणुसकीचा धर्म जोपासत कर्तव्यदक्ष भूमिका साकारली. सुखरूप घरी पोहोचलेल्या या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com