जिल्हयातील गोशाळांकरीता अनुदाणाचे अर्ज आमंत्रीत

गडचिरोली :- जिल्हयातील गोशाळांना आर्थीकदृष्टया सक्षम करण्याकरीता सन 2024-25 पासुन गोशाळेत ठेवण्यात येणाऱ्या देशी गायींना रु. 50/- प्रतीदिन प्रती गोवंश अनुदान देण्यासाठी योजना राबवीण्यास शासन मान्यता प्राप्त आहे. सदर योजनेअंतर्गत अनुदानाच्या पात्रतेच्या अटीनुसार जिल्हयातील गोसंगोपनाचा किमान 3 वर्ष अनुभव असलेल्या, गोशाळेत किमान 50 गोवंश व संस्थेतील ईअर टॅगींग (भारत पशुधन प्रणालीवर) असलेले गोसेवा आयोगाकडील नोंदणीकृत गोशाळा, गोसदन, पांजरापोळ व गोरक्षण संस्थेमधील देशी गाई अनुदानास पात्र आहेत.

त्या करीता ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत दिनांक 31 डिसेंबर2024 पर्यंत आहे. सदर योजनेचे उददेश व स्वरुप, अनुदाना पात्रतेच्या अटी व शर्ती योजनेची अमलबजावणी तसेच योजनेचा ऑनलाईन अर्ज व त्यासोबत जोडावयाची अनुषंगीक कागदपत्रे इ. सवीस्तर माहीती www.mahagosevaayog.org व http://schemes. mahagosevaayog.org या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. त्याचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे. ऑनलाईन पध्दतीने अर्ज स्वीकारणे १६ डिसेंबर २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४,गोसेवा आयोग मार्फत प्राप्त अर्जाची प्राथमीक तपासणी ०१ जानेवारी २०२५ ते १० जानेवारी २०२५, जिल्हा गोशाळा पडताळणी समीतीव्दारा प्राथमीक तपासणी अुती पात्र गोशाळांची प्रत्यक्ष भेट व पडताळणी ११ जानेवारी २०२५ ते २० जानेवारी २०२५, जिल्हा गोशाळा पडताळणी समीती अहवालानुसार अनुदानास पात्र गोधनांची संख्या आयोग कार्यालयास कळवीणे २१ जानेवारी २०२५ ते २५ जानेवारी २०२५ .

तरी जिल्हयातील ईच्छुक गोशाळा यांनी वर दिलेल्या वेळापत्रकानुसार ऑनलाईन अर्ज करण्यास डॉ.विलास अ. गाडगे,जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त गडचिरोली यांनी आवाहन केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

चंद्रपूर मनपातर्फे " भव्य राज्यस्तरीय भिंतीचित्र महोत्सव "

Sat Dec 21 , 2024
– वैयक्तीक व गट बनवुन घेता येणार सहभाग – हौशी व व्यावसायिक चित्रकारांना संधी – प्रथम बक्षीस 1 लक्ष 51 हजार रुपये चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे भव्य राज्यस्तरीय भिंतीचित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असुन संपुर्ण राज्यातील हरहुन्नरी कलावंतांचा यात समावेश असावे यादृष्टीने प्रयत्न केले जात आहे. नववर्षातील 03 जानेवारी ते 06 जानेवारी दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेत भिंतीचित्र पेंटींग,वृक्ष पेंटींग, क्रीएटीव्ह […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!