नागपूर :- राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिका नागपूर येथे एकूण ५१ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ५२ आयुष्मान आरोग्य मंदिर (U-HWC) कार्यान्वित आहे. ज्याद्वारे प्रतीबंधान्त्मक, उपचारात्मक आणि प्रोत्साहात्मक आरोग्य सेवा देण्यात येतात.
डॉ विजय बाविस्कर, अति.अभियान संचालक आणि श्रीमती दिप्ती देशमुख , सह.संचालक, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान , मुंबई यांचेद्वारे नागपूर महानगरपालिका नागपूर क्षेत्रातील इंदोरा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच ढोबळे सभागृह आयुष्मान आरोग्य मंदिर (U-HWC) ईथे दिनांक १९ डिसेंबर २०२४ रोजी भेट देण्यात आली. डॉ समीर आगलावे, राज्य कार्यक्रम व्यवस्थापक, डॉ दीपक सेलोकर वैद्यकीय आरोग्य अधिकारी, महानगरपालिका आणि पंकज नंदनवार , विभागीय कार्यक्रम व्यवस्थापक सोबत उपस्थित होते. शहर कार्यक्रम व लेख व्यवस्थापक हे क्षेत्रभेटी दरम्यान टीम सोबत होते.
यामध्ये त्यांनी आरोग्य केंद्र द्वारे देण्यात येणारे आरोग्य सुविधा याचे निरीक्षण केले. व आरोग्य सुविधा यांचा दर्जा उंचावण्यासाठी काही महत्वपूर्ण सूचना दिल्या.
अति. आयुक्त( शहर) आंचल गोयल यांची भेट घेवून आरोग्य सुविधा बाबत चर्चा केली. तसेच नागपूर ग्रामीण मधील तालुका आरोग्य अधिकारी आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान सर्व समन्वयक तसेच नागपूर महानगरपालिका राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत सर्व योजनांचा आढावा घेण्यात आला.
डॉ विजय बाविस्कर, अति.अभियान संचालक यांनी सर्व अधिकारी यांना आपण करीत असलेल्या कामामध्ये आपुलकी चा भाव आणून रुग्णांना उचित दर्जेदार सेवा द्याव्यात याबाबत प्रोस्ताहित केले.
इंदोरा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र हे NQAS राष्ट्रीय नामांकन प्राप्त असून तेथील अधिकारी व कर्मचारी यांचे कामाबाबत अभिनंदन केले. तसेच इंदोरा प्रमाणे ईतर सर्व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र यांनी NQAS राष्ट्रीय नामांकन प्राप्त करून घेण्याबाबत त्यांची प्रेरणा घ्यावी व हे मॉडेल सर्वीकडे अंमलबजावणी होणे अभिप्रेत आहे.असे सूचना दिल्या.
जास्तीत जास्त नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र हे NQAS राष्ट्रीय नामांकन प्राप्त करतील असे सूचना दिल्या.
राज्य स्तरीय प्रलंबित विषय वेळीच सोडविले जावेत याबाबत संबंधितांना सूचना दिल्या.
योजना निहाय मार्गदर्शन राज्यस्तरीय अधिकारी यांचे द्वारे करण्यात आले. डॉ दीपक सेलोकर वैद्यकीय आरोग्य अधिकारी, महानगरपालिका नागपूर यांनी योजनानिहाय महानगरपालिका निगडीत प्रगती अहवाल सादर केला. डॉ.रेवती ढोबळे , जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी यांनी आभार प्रदर्शन केले.