राष्टीय कुष्ठरोग कार्यक्रम स्पर्श अभियानांतर्गत मॅराथॅान

नागपूर :- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीला त्यांना अभिवादन व त्यांचे अपूर्ण काम पूर्ण करण्याचा संकल्प करित आज स्पर्श अभियानांतर्गत कुष्ठरोग जनजागृतीसाठी मॅराथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

जिल्हा एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण संस्था तसेच राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रम जिल्हा नागपूरद्वारा 30 जानेवारी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने कुष्ठरोग पंधरवाडा 30 जानेवारी ते 13 फेंब्रुवारी या दरम्यान स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान आयोजित करण्यात आले आहे. यानुषंगाने 30 जानेवारीला मॅराथॉन दौड ‘रन फॉर लेप्रसी’चे आयोजन करण्यात आले होते. मॅराथॉनमध्ये 18 ते 30, 30 ते 45 व 45 च्या वर असे वयोगटामध्ये पुरुष आणि महिला या दोन गटात आयोजित करण्यात आली होती. मॅराथॉन दौडमध्ये साधारणपणे विविध गटातील एकूण 1 हजार 500 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.

यावेळी कुष्ठरोगाबाबत प्रतिज्ञाचे वाचन करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या वेळी मनपाच्या अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, पोलीस उपायुक्त अर्चित चांडक, एनडीआरएफचे डेप्युटी कमांडन्ट निशांत चौधरी, आय. एफ. एस. हरवीर, पोलीस उपायुक्त निकेतन कदम, आरोग्य सेवेच्या उपायुक्त डॉ. कांचन वानेरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड उपस्थित होते.

मॅराथॉनचा प्रारंभ फ्रिडम पार्क येथून मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. मॅराथॉन समाप्तीनंतर स्पर्धेतील प्रत्येक गटातील महिला व पुरुष अशा 6 गटातील एकूण 18 विजेत्यांना रोख पारितोषिक, प्रथम 2 हजार, द्वितीय 1 हजार व तृतीय 500 रुपये तसेच प्रशस्तीपत्र मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. तसेच रोगमुक्त झालेल्या कुष्ठरोग्णांचा सत्कार जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ. राज पी. गहलोत यांनी या वर्षीचे घोषवाक्य ‘कलंक कुष्ठरोगाचा मिटवू या, सन्मानाने स्विकार करु’ चे वाचन करुन अभियानात 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2024 या पंधरवाड्यात जिल्ह्‌यात विविध आरोग्य शिक्षण उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. जसे शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा, प्रश्न मंजुषा स्पर्धा, त्वचारोग शिबीरे, खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांसाठी कार्यशाळा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

WCL के नए CMD होंगे जेपी द्विवेदी

Wed Jan 31 , 2024
नागपुर :- जय प्रकाश द्विवेदी को मंगलवार को COAL INDIA LIMITED की अनुषांगिक कंपनी WCL का नया CMD ( अध्यक्ष सह प्रबंधक निदेशक) नियुक्त किया गया। द्विवेदी फिलहाल WCL के तकनीकी निदेशक है। कार्मिक मंत्रालय द्वारा जारी आदेश में कहा गया कि मंत्रिमंडल की नियुक्ति समिति ने द्विवेदी की नियुक्ति को मंजूरी दे दी है। वे एक फरवरी 2024 को […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com