चोरी करणाऱ्या आरोपीस अटक

नागपूर :- दिनांक २३.०३.२०२४ चे १५.०० वा. ते १६.०० वा. दरम्यान, पोलीस ठाणे पाचपावली हद्दीत, नवा नकाशा, जयस्वाल रेस्टॉरन्टचे मागे, नागपूर येथे राहणारे फिर्यादी सुशांत रूपदास भिवगडे, वय ३२ वर्षे, यांनी त्यांची अॅटलस कंपनीची सायकल किमती अंदाजे ३,०००/- रू ची ही आपले घरा जवळ ठेवली असता, ती कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे पाचपावली येथे अज्ञात आरोपी विरूध्द कलम ३७९ भा.द.वि. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.

गुन्हयाचे समांतर तपासादरम्यान पाचपावली चे अधिकारी व अंमलदार यांनी खात्रीशीर गोपनीय माहिती व तांत्रिक तपास करून, आरोपी नामे शेख आसीफ वल्द शेख रहीम, वय ३५ वर्ष, रा. शिवशक्ती नगर, यशोधरानगर, नागपूर यास ताब्यात घेवुन विचारापुस केली असता, त्याने वर नमूद गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपीचे ताब्यातुन गुन्हयात चोरी गेलेली सायकल किंमत्ती अंदाजे एकुण ३,०००/- रु. ची जप्त करण्यात आली. आरोपीस अधिक सखोल विचारपूस केली असता, आरोपीने यागुन्हया व्यतीरिक्त इतर वेगवेगळया १० ठिकाणावरून वेगवेगळ्या कंपनीच्या सायकल चोरी केल्याचे सांगीतले, आरोपीचे ताब्यातुन एकुण ११ सायकल किमती अंदाजे ४४,०००/- यी जप्त करून आरोपीस अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.

वरील कामगिरी पोलीस उपआयुक्त (परि क. ३), सहा. पोलीस आयुक्त, लकडगंज विभाग यांचे मार्गदर्शनात, वपोनि बाबुराव राऊत, सपोनि प्रविण सोमवंशी, पोहवा ज्ञानेश्वर भोगे, छगन सिंगणे, नापो, ईमरान शेख, रोमेश मेनेवार, पोअं. राहुल चिकटे, गगन यादव, संतोष शेन्द्रे, महेन्द्र सेलोकर यांनी केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आगामी लोकसभा निवडणुक २०२४ आदर्श आचारसंहीता दरम्यान नागपूर शहर पोलीसांची दारूबंदी, एन.डी.पी. एस., तथा भारतीय शस्त्र कायदा अंतर्गत कारवाई

Tue Mar 26 , 2024
नागपूर :-पोलीस आयुक्त, नागपुर शहर, सह पोलीस आयुक्त, नागपुर शहर, अपर पोलीस आयुक्त (उत्तर व दक्षिण प्रादेशीक विभाग), अपर पोलीस आयुक्त, (गुन्हे) यांचे मार्गदर्शनात, आगामी लोकसभा निवडणुक-२०२४ आदर्श आचारसंहीता तसेच आगामी सण उत्सव संबंधाने नागपुर शहर पोलीसांनी, नागपुर शहर अंतर्गत सर्व पोलीस ठाणे हद्दीत कायदा व सुव्यवस्थेचे दृष्टीने तसेच, गुन्हेगारावर वचक बसावा, याकरीता दिनांक १६.०३.२०२४ चे ०६.०० वा. ते दिनांक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!