प्रारूप मतदान केंद्राच्या यादीवर हरकती किंवा सूचना असल्यास नोंदवावे – उपजिल्हा निवडणूक अधिकारी

भंडारा :- भारत निवडणूक आयोगाने दिनांक २९ मेच्या पत्रातील निर्देशान्वये जाहिर केलेल्या पुनरिक्षण पुर्व कार्यक्रमांतर्गत, भंडारा जिल्हयातील ६०-तुमसर, ६१-भंडारा, ६२-साकोली विधानसभा संघाच्या मतदान केंद्रांचे सुसुत्रिकरण व प्रमाणिकरण करुन प्रारुप मतदान केंद्र यादी दि.२१ सप्टेंबर रोजी उपजिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयात प्रसिध्द करण्यात आलेली आहे. ही यादी https://bhandara.gov.in या संकेतस्थळावर देखील पहाण्यास उपलब्ध आहे.

या यादी संदर्भात नागरिकांना तसेच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना हरकती व सुचना नोंदवायच्या असल्यास त्यांनी २९ सप्टेंबर रोजी सकाळी 11.00 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय, भंडारा (निवडणूक शाखा) या ठिकाणी नोंदवाव्यात. त्या स्विकारण्यात येतील. ही प्रारुप मतदान केंद्र यादी सर्व उपविभागीय अधिकारी व तहसिल कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रसिध्द करण्यात आली असल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रशांत पिसाळ यांनी कळवले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

इंडियन ब्युरो ऑफ माईन्स - आयबीएम व्दारे 'स्वच्छता ही सेवा ' या उपक्रमांतर्गत सायकल रॅलीचे आयोजन

Tue Sep 26 , 2023
नागपूर :- नागपूरच्या सिव्हिल लाईन स्थित केंद्रीय खाण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या इंडियन ब्युरो ऑफ माईन्स – आयबीएम मुख्यालयातून आज अधिकारी आणि कर्मचारी यांनी नागपूरच्या झिरो माईल पर्यंत ‘स्वच्छता ही सेवा ‘ या उपक्रमांतर्गत सायकल रॅली आयोजित केली. या सायकल रॅलीच्या माध्यमातून स्वच्छतेचे महत्व सायकलींगचा स्वास्थ जीवनशैलीत समावेश त्याचप्रमाणे कार्बन फुटप्रिंट कमी करण्यासाठी संदेश देण्यात आला. याप्रसंगी अधिकारी आणि कर्मचारी यांनी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com