आगामी लोकसभा निवडणुक २०२४ आदर्श आचारसंहीता दरम्यान नागपूर शहर पोलीसांची दारूबंदी, एन.डी.पी. एस., तथा भारतीय शस्त्र कायदा अंतर्गत कारवाई

नागपूर :-पोलीस आयुक्त, नागपुर शहर, सह पोलीस आयुक्त, नागपुर शहर, अपर पोलीस आयुक्त (उत्तर व दक्षिण प्रादेशीक विभाग), अपर पोलीस आयुक्त, (गुन्हे) यांचे मार्गदर्शनात, आगामी लोकसभा निवडणुक-२०२४ आदर्श आचारसंहीता तसेच आगामी सण उत्सव संबंधाने नागपुर शहर पोलीसांनी, नागपुर शहर अंतर्गत सर्व पोलीस ठाणे हद्दीत कायदा व सुव्यवस्थेचे दृष्टीने तसेच, गुन्हेगारावर वचक बसावा, याकरीता दिनांक १६.०३.२०२४ चे ०६.०० वा. ते दिनांक २४.०३.२०२४ ये ०६.०० वा. चे दरम्यान अवैध दारू शस्त्रे/अंमली पदार्थ बाळगणारे वा विक्री करणारे ईसमांवर कारवाई करून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त करून आरोपींवर कायदेशीर कारवाई केली.

नागपूर शहर पोलीसांनी नमुद मोहीमेदरम्यान नागपुर शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत सर्व पोलीस ठाणे हद्दीत १) महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये १३० केसेसमध्ये एकूण १४४ ईसमावर कारवाई करून रू. २,९९,३४५/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. २) एन.डी.पी.एस. कायद्यान्वये एम.डी. पावडर संबंधीत ०१ आणि गांजा संबंधीत ०२ असे ०३ केसेसमध्ये एकुण ०३ सिमावर कारवाई केली व आरोपींचे ताब्यातुन रू. ७,३७,७५०/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ३) भारतीय शस्त्र अधिनियम अंतर्गत ३२ केसेसमध्ये एकुण ४३ ईसमावर कारवाई केली असता, आरोपींचे ताब्यातुन ०५ अग्नीशस्त्रे, ०९ काडतुस, २६ चाकु, ०१ कोयता, ०४ तलवार, ०१ भाला असे एकुण ५४६ वेगवेगळे शस्खे किंमती अंदाजे रू. २,२७,८००/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याव्यतीरिक्त, आरोपोंचे ताब्यातुन गुन्ह्यादरम्यान वापरातील दुचाकी, चारचाकी वाहने, मोबाईल, नगदी व ईतर साहीत्य असा एकुण किंमती अंदाजे ३८,१०,४२०/- रू. चा मु‌द्देमाल सुध्दा जप्त करण्यात आला.

पोलीस आयुक्त, नागपुर शहर यांचे आदेशाने व मार्गदर्शनात वरील मोहीम ही आगामी लोकसभा निवडणुक २०२४ आदर्श आचारसंहीता तथा आगामी सण उत्सव संबंधाने एकत्रितरित्या नागपूर शहर पोलीसांतर्फे राबविण्यात आली असून, यापुढेही प्रभावीपणे कारवाई करण्यात येणार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पोलीस स्टेशन कुही हद्दीत जुगार अड्ड्यावर कुही पोलीसांची धडक कारवाई

Tue Mar 26 , 2024
कुही :- पोस्टे. कुही हद्दीतील मौजा कुही ते बोडखीपेठ रोडवर माल्याचा गोठयाजवळ जुगार सुरू असल्याबावत गुप्त बातमीदारांकडुन मिळालेल्या खात्रीशिर माहीतीवरून दिनांक २४/०३/२०२४ रोजी पोलीस स्टेशन कुही येथील पोलीसांच्या पथकाने सदर जुगार अड्ड्याची योजनावध्द पद्धतीने आखणी करूण सदर जुगार अड्ड्यावर धाड टाकुण सदर जुगार अडयावर ०८ जुगार खेळणारे आरोपीतांना ताब्यात घेवुन आरोपीतांची अंगझडती घेतली असता त्याचा अंगझडतीमधुन व डावावरूण व घटनास्थळावरूण […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com