पळवून नेणाऱ्या आरोपीविरूध्द गुन्हा दाखल

एमआयडीसी बोरी :- फिर्यादीची मुलगी ही इयत्ता १२ वी मध्ये शिकत असून घरून सकाळी ०७.०० वा. गार्डन चौक येथून स्टार बस पकडुन कॉलेजला जाते व दुपारी १२.३० वा. परत येते. दिनांक ०९/०९/२०२३ रोजी सकाळी ०७.०० वा. ती घरून कॉलेजला गेली व १२.३० वा. घरी परत आली नाही. दुपारी ०३.३० वा. दरम्यान फिर्यादीने तिची मुलगी हिला फोन केले असता फोन बंद आला. कॉलेज मध्ये जावून विचारपुस केली असता ती कॉलेजला आली नाही असे समजले. तिचा शोध घेतला परंतु तो मिळुन आली नाही. कोणीतरी अज्ञात आरोपीने फिर्यादीच्या मुलीला पळवून नेले आहे. सदर प्रकरणी फिर्यादी यांच्या रिपोर्टवरून पो.स्टे. एमआयडीसी बोरी येथे आरोपीविरुध्द कलम ३६३ भादंवि कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे. आरोपीचा शोध घेणे सुरू असून सदर गुन्हयाचा पुढील तपास पोना दिपाली फटींग ब. नं. १२६८ पोस्टे एमआयडीसी बोरी या करीत आहे.

NewsToday24x7

Next Post

भाद्रपद महोत्सव की तैयारियां जोरों पर

Mon Sep 11 , 2023
– श्री रानी सती ज्योति खन्ना प्रस्तुत करेंगे सुमधुर भजन गंगा  नागपुर :-नंदनवन के श्री रानी सती मंदिर में भाद्रपद महोत्सव 15 सितंबर को धूमधाम से श्री रानी सती चैरिटेबल ट्रस्ट की ओर से मनाया जा रहा है। इसकी तैयारियां जोरों पर चल रही हैं। अध्यक्ष रमा खेमुका ने बताया कि 14 सितंबर को सुबह 9 बजे ध्वजा यात्रा श्री […]

You May Like

Latest News

The Latest News

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com