घरफोडी करणाऱ्या आरोपीविरूध्द गुन्हा दाखल

नागपूर :- पोलीस ठाणे हुडकेश्वर हद्दीत फ्लॉट नं. ७२/ए, विठ्ठल नगर १. दुर्गा माता मंदीर जवळ, हुडकेश्वर, नागपूर येथे राहणाऱ्या फिर्यादी नामे निर्मला मधुकराव भुरकुंडे, वय ७९ वर्ष, यांची प्रकृती खराब असल्याने त्या आपले राहते घराला कुलूप लावून मुलीचे घरी महाल येथे गेल्या असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे घराचे मुख्य दाराचे कुलूप तोडुन, आत प्रवेश करून बेडरूम मधील अलमारीतुन सोन्या-चांदीचे दागिने व रोख २०,०००/- रु. असा एकुण किंमती अंदाजे २,९२,२५०/- रू चा मुद्देमाल चोरून नेला.

याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तकारीवरून पोलीस ठाणे हुडकेश्वर येथे मसपोनि, दंडवते यांनी अज्ञात आरोपीविरूध्द कलम ३०५(अ), ३३१(३), ३३१ (४) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखाल करून पुढील तपास करीत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

घातकशस्त्र बाळगणाऱ्या आरोपीस अटक

Fri Oct 25 , 2024
कामठी :- नविन कामठी पोलीस पथकाचे अधिकारी व अंमलदार हे पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना, त्यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून, अल हवीय हटिल जवळ, सार्वजनिक रोडवर एक संशयीत ईसम त्याचे कमरेत कोणीतरी वस्तु बाळगुन संशयीत हालचाली करतांना दिसुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन, नाव पत्ता विचारले असता, त्याने त्याचे नाव नविन मिलींद बारसे, वय २४ वर्षे, रा. न्यू येरखेडा, कामठी, नागपुर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com