कोदामेंढी :- येथील ग्राम पंचायत कार्यालयात दिनांक 13 मार्च सोमवार ला दुपारी 12.00 वाजता विशेष ग्राम सभेचे आयोजन करण्यात आले आहे.सभेत मागील सभेचे इतिवृत्त चे वाचन करून कायम करणे, माहितीचा अधिकार 2005 बाबत माहिती देणे, सन 2023-24 चे अंदाज पत्रकास मंजूरी देणे, सन 2023 -24 चा वार्षिक विकास आराखड़ा (GPDP) तयार करणे, ग्राम रोजगार सेवक किशोर साहू यांना त्यांच्या पदावरुण निष्काषित करणे, अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे अंतर्गत पंचवार्षिक आराखाद्याला मंजूरी देणे, अध्यक्ष यांचे परवनागिने वेळेवर येणारे विषय. यांच्यावर चर्चा होऊन ठराव घेण्यात येणार आहे. तरी उन्हेळ्याची चाहुल लागली असतंना, कोदामेंढी ग्राम पंचायत च्या इतिहासत प्रथमच दुपारी 12.00 वाजता आयोजित केलेल्या सभेत उपस्थित रहाण्याचे आव्हान ग्रामस्थानच्या करवासुलीतून प्रवास भत्ता घेणारा सरपंच आशिष बावनकुले, गलथान कारभारचा उच्चाक गठनारा ग्रामविकास अधिकारी आनंद लोलुसरे आज़ सकाळी 10.00 ला झालेल्या दवाण्डीच्या माध्यमतून केले आहे..