कामठी :- नविन कामठी पोलीस पथकाचे अधिकारी व अंमलदार हे पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना, त्यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून, अल हवीय हटिल जवळ, सार्वजनिक रोडवर एक संशयीत ईसम त्याचे कमरेत कोणीतरी वस्तु बाळगुन संशयीत हालचाली करतांना दिसुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन, नाव पत्ता विचारले असता, त्याने त्याचे नाव नविन मिलींद बारसे, वय २४ वर्षे, रा. न्यू येरखेडा, कामठी, नागपुर असे सांगीतले. त्याची अंगझडती घेतली असता, त्याचे कमरेत एक लोखंडी पात्याचा चाकू किंमती अंदाजे २००/- रू. या मिळुन आल्याने तो जप्त करण्यात आला. आरोपी हा घातक शस्त्र बाळगतांना समक्ष मिळुन आल्याने, व त्याने मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याने, त्याचे विरुध्द पोलीस ठाणे नविन कामठी येथे पोअं. नितेश नवघडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून सपोनि. येवले यांनी आरोपीविरूध्द कलम ४/२५ भा.ह.का.. सहकलम १३५ म.पो.का. अन्वये गुन्हा दाखल करून, आरोपीस अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.
घातकशस्त्र बाळगणाऱ्या आरोपीस अटक
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com