लाडक्या लेकी’च्या सक्षमीकरणासाठी महायुती सरकारची संरक्षणाची सावली!

– भाजपा महिला मोर्चा तर्फे उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे अभिनंदन

मुंबई :-राज्याच्या २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेली ‘लेक लाडकी’ योजना राज्यात लागू करण्याचा निर्णय महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाल्याने महिला सक्षमीकरणाच्या महाराष्ट्राच्या परंपरेत मानाचा नवा तुरा खोवला गेला आहे. राज्यातील असंख्य गरीब कुटुंबांतील मुलींचे भविष्य उजळून काढणाऱ्या या निर्णयाबद्दल भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले आहे. या निर्णयामुळे भावी पिढीतील मुलींच्या सक्षमीकरणाच्या दिशेने दमदार पाऊल पडले आहे, असे  वाघ यांनी म्हटले आहे. या योजनेद्वारे वयाच्या १८ व्या वर्षी मुलीच्या खात्यात एक लाखांपर्यंतची रक्कम जमा करण्यात येणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली आहे.

चित्रा वाघ यांनी पत्रकात म्हटले आहे की , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना ‘लेक लाडकी’ योजनेचा तपशील जाहीर केला होता. आंतरराष्ट्रीय कन्या दिनाच्या पूर्वसंध्येस आणि दुर्गा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही योजना सुरु करून फडणवीस यांनी या संकल्पाची पूर्तता केली आहे. महिलांना एसटी प्रवासात पन्नास टक्के सवलत देण्याच्या क्रांतिकारी निर्णयामुळे राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणाचा मोठा टप्पा गाठला गेला आहे. केंद्रातील मोदी सरकारने अलीकडेच महिलांना राजकीय आरक्षण जाहीर करून समान संधींचे वचन पूर्ण केले आहे.

पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबात मुलीचा जन्म झाल्यावर ५ हजार रुपये, इयत्ता पहिलीत गेल्यावर ६ हजार रुपये, सहावीत गेल्यावर ७ हजार रुपये, ११ वीत गेल्यावर ८ हजार रुपये, १८ वर्षे पूर्ण झाल्यावर ७५ हजार रुपये, अशा रितीने एकूण त्या मुलीस १ लाख १ हजार रुपये एवढा लाभ मिळेल. थेट लाभार्थी हस्तांतरण (डीबीटी) द्वारे योजनेची रक्कम लाभार्थींना देण्यात येणार आहे. १ एप्रिल २०२३ नंतर कुटुंबात जन्मणाऱ्या १ अथवा २ मुलींना त्याच प्रमाणे १ मुलगा व १ मुलगी असल्यास मुलीला या योजनेचा लाभ मिळेल. दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी जुळी अपत्ये जन्माला आल्यास त्यापैकी १ मुलगी किंवा दोन्ही मुली असल्यास दोघींना या योजनेचा लाभ मिळेल, अशी माहितीही चित्रा वाघ यांनी दिली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अनैतिक देहव्यापार करण्यास प्रवृत्त करणारे आरोपी गजाआड

Wed Oct 11 , 2023
– स्थानिक गुन्हे शाखा यांची कारवाई खापरखेडा :-दि. ०९/१०/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गुप्त बातमीदारांकडुन माहीती मिळाली की पोलीस स्टेशन खापरखेडा अंतर्गत जयभोले नगर वार्ड क्र. ०५ चनकापुर परीसरात राहणारा अजय गुणा नावाचा इसम हा स्वत:चे आर्थिक फायदयाकरीता आपले राहते घरी आपली आई चंदा हिच्या सोबत बाहेरून स्त्रिया बोलावून त्यांना आपले घरी गीन्हाईक व जागा उपलब्ध करून अवैध वेश्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com