नागपूर :- दिनांक २४.०५.२०२३ चे २२.०० वा. ते २२.३० वा. चे दरम्यान पोलीस ठाणे वाठोडा हद्दीतील पवनशक्ती नगर, चॉदमारी इपिंग यार्ड समोरील रोडवरून फिर्यादी यांचे वडील राजेंद्र गोविंद मगर वय ६० रा. पॅथर नगर,झोपडपट्टी, नागपुर हे तेलाचे डबे कारखाण्यातुन घेवुन रिक्षाने ऑर्डरवर पोहचविण्याचे काम करतात. ते रिक्षा घेवुन जात असता अज्ञात वाहन चालकाने त्याचे ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून फिर्यादीचे वडील यांना धडक देवून गंभीर जख्मी करून त्यांचे घटनास्थळी मृत्यूस कारणीभूत होवुन पळून गेला.
याप्रकरणी फिर्यादी पवन राजेंद्र मगर वय ३० वर्ष रा. पॅथर नगर झोपडपट्टी, नागपुर यांनी दिलेल्या तकारीवरून पोलीस ठाणे वाठोडा येथे पोउपनी लेपांडे यांनी आरोपी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध कलम ३०४(अ), २७९, भादंवी सहकलम १३४, १७७ मोवाका अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध घेत आहे. पुढील तपास सुरू आहे.