नागपूर :- दिनांक २४.०५.२०२३ ००.३० वा. ते ००.४५ वा. चे दरम्यान पोलीस ठाणे गणेशपेठ हद्दीत लोधीपुरा रतन कॉम्पलेक्स, संदेश दवा बाजारच्या बाजुला हज हाउस मागे राहणारे फिर्यादी सय्यद जावेद अली वल्द जाफर अली वय ३१ वर्ष यांना आरोपी शेख अजहर शेख मजहर वय २६ वर्ष रा. लोधीपुरा, गणेशपेठ यांना २२.३० वा. ते मोमीनपुरा येथे जात असता त्यांचे जवळ येवून “तू चोरी के मोबाइल बेचता है मुझे एक मोबाईल दे” असे म्हटले असता फिर्यादीने मै ऐसा काम नहीं करता असे म्हणून निघुन गेले. आरोपीने फिर्यादीचे घरी जावून अश्लिल शिवीगाळ केली व फिर्यादीचे पत्नीला जीवे मारण्याची धमकी दिली. फिर्यादी परी आले असता त्यांना सुद्धा आरोपीने शिविगाळी केली. फिर्यादीचे नातेवाईकांना माहित झाल्याने ते फिर्यादीकडे आले. फिर्यादीचे मामाचा मुलगा आवेज खान बल्द अहमद खान वय २८ वर्ष रा. गांधीबाग, फवारा चौक हा आला व तो आरोपी विरूध्द पोलीसात तक्रार देणार आहे असे आरोपीस माहिती झाल्याने आरोपीने घटनेवेळी त्याचे जवळ जाऊन त्याला मानेवर चाकुने वार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करून गंभीर जखमी केले. जखमीचा उपचार मेयो हॉस्पीटल येथे सुरू आहे.
याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे गणेशपेठ येथे आरोपीविरूद्ध पोउपनि कोल्हारे यांनी कलम ३०७,२९४,५०६(ब) भादंवी अन्वये गुन्हा नोंदवून आरोपीचा शोध घेवून त्यास अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.