महादुला – कोराडीत छत्रपतींना मानाचा मुजरा

महादुला :- दरवर्षी पेक्षा यावर्षी जोरदार अशी छत्रपतींची ३४० वी जयंती साजरी करण्यात आली, रँलीचे विशेष आकर्षण म्हणजे शिवाजी महाराजासारखी वेषभूषा असलेली व्यक्ती बग्गीमध्ये आरूढ होती, त्यांच्या मागे पुढे घोडेस्वारी करणारे मावळे शिलेदार सर्वांचे लक्ष वेधून घेत होते, रँली दुपारी १२ वाजता महादुला टी-पाँइंट पासुन ते शिवाजी नगर ते परत कोराडी ते नांदा पुनर्वसन असा एकंदरीत रूट होता जवल जवल ३ कि.मी. अंतर होते.

रँलीत परीसरातील हायस्कुलचे लेझीम पथक, भगवे फेटे बांधुन सगले शिवाजीचे मावळे व रणरागिणी सुध्दा फेटे परिधान करून होते, प्रत्येक चौकाचौकात पिण्याच्या पाण्याची सोय, अनाथपिंडक बुद्धविहारात नगरसेवक पंकज ढोणे आणि मित्रमंडलाचे वतीने शरबत वितरण करण्यात आले, कोराडी भारतमाता चौक मध्ये ग्रापं सरपंच नरेंद्र धनूले व त्यांच्या सहकाऱ्यांनी शरबत व नास्ताची सोय केली, रँलीत २ प्रकारचे बँंड होते लेझीमची मुले हलकीच्या तालावर जोरदार न्रूत्य करीत होते.

रॅली मध्ये मनोज सावजी, कुणाल भोस्कर, संकेत बावनकुळे, राजेश रंगारी नपं अध्यक्ष, जि.प. सदस्य नाना कंभाले, माजी नगरसेवक रत्नदिप रंगारी, पन्नालाल रंगारी, दिलीप वाघमारे, अक्षय काले, हर्षल हिंगणेकर,बापु बावनकुले, किशोरबरडे

नांदा टी-पॉइंट वर महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष वि.प.सदस्य माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भगवा फडकवत कार्यकर्तयांचा जोश वाढवला लोणखैरी रोड शिवाजी चौक येथे आशिष राऊत उपसरपंच कोराडी, धिरज ढोले, विधु सावजी, हेमराज चौधरी, दर्श गहुकर, सुनील चींचुरकर, सुधीर भडंग, गजानन ठाकरे, धनराज डहारे, नितेश धुर्वे व नैवैद्यम ग्रूपकडुन सर्वच शिवभक्तांना महाप्रसाद वितरित करण्यात आला.

या रॅलीत श्री राजाभोज संस्था, शताब्दी स्पोर्टीग क्लब, माँ जगदंब क्रिकेट क्लब, नागद्वार स्वामी संस्था, कोहीनुर क्रिकेट क्लब, श्री जगदंबा प्रतिष्ठाण च्या अध्यक्षा ज्योती बावनकुळे, नंदा तुरक, उषा कोडगुले, रेखा बारमाटे, वंदना पौनीकर आणी मोठ्याप्रमाणात शिवभक्त यांची उपस्थिती होती.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श कार्य प्रेरणादायी - माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर

Tue Feb 20 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी जगाला प्रजासत्ताची शिकवण दिली.महाराजांचे जीवन चरित्र सर्वांसाठी प्रेरणादायी असून पन्नास वर्षाच्या आयुष्यामध्ये असंख्य पिढ्याना आदर्श ठरणारे शिवरायांचे चरित्र प्रेरणादायी ठरते.बहुजनांच्या कल्याणासाठी झटणारा राजा महाराष्ट्रात निर्माण होणे संपूर्ण देशाचे भाग्य आहे.असे मौलिक मत नागपूर जिल्हा परिषद चे माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर यांनी 19 फेब्रुवारीला येरखेडा येथील […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com