सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या 51 प्रकरणांची नोंद

– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई   

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाईची सुरुवात केली आहे. गुरुवार (ता. 13) रोजी उपद्रव शोध पथकाने 51 प्रकरणांची नोंद करून 36 हजार 500 रुपयाचा दंड वसूल केला.

शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु आहे. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. ४००/- दंड) या अंतर्गत 12 प्रकरणांची नोंद करून 4 हजार 800 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 07 प्रकरणांची नोंद करून 2 हजार 800 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

मॉल, उपहारगृह, लॉजिंग, बोर्डिंगचे होर्डिंग, सिनेमाहॉल, मंगल कार्यालये, कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 01 प्रकरणाची नोंद करून 2 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. वाहतुकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 10 प्रकरणांची नोंद करून 15 हजार 500 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. सार्वजनिक रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी वाहने/जनावरे धुवून परीसर अस्वच्छ करणे या अंतर्गत 01 प्रकरणाची नोंद करुन 1 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.

उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव (व्यक्ती) असल्यास 12 प्रकरणांची नोंद करून 2 हजार 400 रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव (संस्था) असल्यास 8 प्रकरणांची नोंद करून 8 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

*प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवी बाळगणाऱ्या 01 प्रकरणांची नोंद*

मनपाच्या उपद्रव शोध पथकाद्वारे गुरुवारी (ता. 13) रोजी प्रतिबंधक प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या गांधीबाग झोन अंतर्गत साई किराणा स्टोर्स गांजाखेत चौक हंसापुरी या अंतर्गत 5 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. हनुमान नगर झोन अंतर्गत साई प्राईड आकाश नगर मानेवाडा बांधकामाचा कचरा रस्त्‍यालगत टाकल्याबाबत 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. लक्ष्मीनगर झोन अंतर्गत विराज ईन्फ्राटेक सुरेंद्र नगर यांच्याकडुन रस्त्यालगत कचरा टाकणेबाबत 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. धंतोली झोन श्रीमती कुंदा शंभरकर नरेंद्र नगर खुल्या भुखंडावर लोखंडी पत्र्यांच्याशेड टाकणेबाबत या अंतर्गत 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. सतरंजीपूरा झोन अंतर्गत भिवगडे नेशनल कॉलेज मुडलियार लेआऊट शांती नगर आणि आशी नगर झोन अंतर्गत अर्चिवर लर्निंग सेंटर विनोबा भावे नगर परवानगी न घेता बॅनर आणि होर्डिग लावल्यास दोन प्रतिष्ठांनाकडुन एकुण 10 हजार रुपयाचा दंड वसुल करण्यात आला. असे एकूण 6 प्रकरणांची नोंद करून 35 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

NADP HONOURED WITH BRAND OF THE YEAR AWARD AT ASIAN BUSINESS EXCELLENCE AWARDS AT BANGKOK

Fri Jun 14 , 2024
Nagpur :- In a resplendent ceremony held at the 38th International Summit and Awards: Asian Business Leadership Excellence in Bangkok, Thailand, National Academy of Defence Production (NADP) was conferred the prestigious Brand of the Year Award. Susheel Kumar Saraff Advisor of Thai chamber of commerce graced the occasion. Former Thai Deputy Premier Korn Dabaransi presented the award, while Vice Minister […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com