नागपूर :- दिनांक १०.११,२०२३ ००.१० वा. ते ०१.०० वा. चे दरम्यान अंबाझरी पोलीसांचे पथक पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना त्यांना मिळलेल्या खात्रीशीर माहितीवरून फुटाळा तलाव, यह संगोपन केन्द्र, विहोरी कॅम्पस चौक, अमरावती रोड, नागपूर येथे रेड कारवाई केली असता, दरोडा टाकण्याचे तयारीत असलेले आरोपी क. १) प्रितेश उर्फ मणी नरेश विजवे वय २८ वर्षे, २) संदेश उर्फ संधा राजु पंडागळे, वय २८ वर्षे, ३) आरीफ उर्फ मितेश दिपक सुदामे वय २१ वर्षे तिन्ही रा. सुदामनगरी संदिप बौद्ध विहारा जवळ, नागपूर हे आपले ताब्यात प्राणघातक शस्त्र घेवून दरोडा टाकण्याचे तयारीत असताना समक्ष मिळुन आले व पाहिजे आरोपी ४) अमन ५) रोशन हे अंधाराचा फायदा घेवुन पळून गेले. ताब्यात घेतलेल्या आरोपांचे जवळुन एक लोखंडी सत्तूर, एक लोखंडी रॉड, दौरा, मिर्ची पावडर, व हिरो होन्डा कंपनीची मोटरसायकल असा एकूण अंदाजे २०,२७० /- रू. चा मुद्देमाल मिळुन आल्याने जप्त करण्यात आला.
याप्रकरणी पोलीस अंबाझरी येथे पोउपनि भिवापूरे यांनी आरोपविरुद्ध कलम ३९९ भा. दं.वी. सहकलम ४/२५ भा.इ.का. सहकलम १३५ का अन्वये गुन्हा दाखल करून क. १ ते ३ आरोपींना अटक केलेली आहे. पुढील तपास सुरू आहे.