नागपूर :- संचालक, माहिती व जनसंपर्क नागपूर या कार्यालयातील झेरॉक्स मशीन X-ACT मॉडेल क्रमांक – 5225 निर्लेखीत करण्यात आली असून ही मशीन खरेदी करण्यासाठी दरपत्रक मागविण्यात येत आहेत.
ही झेरॉक्स मशीन 11 नोव्हेंबर 2008 ला खरेदी करण्यात आली असून 15 वर्ष पूर्ण झाल्यामुळे निर्लेखित करण्यात आली आहे. त्याकरिता दरपत्रक, दिनांक 01 जून 2023 रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत या कार्यालयात पोहोचेल अशा बेताने पाठवावी. या कार्यालयास प्राप्त झालेले दरपत्रक सर्व संबंधित दरपत्रक धारकां समोर दिनांक 02 जून 2023 रोजी सकाळी 11 वाजता उघडण्यात येतील. दरपत्रक धारक अनुपस्थित राहिल्यास दरपत्रक कार्यालयातील समिती सदस्या समोर उघडण्यात येतील. त्यानंतर याबाबत कोणतीही सबब ऐकली जाणार नाही, याची संबंधितांनी नोंद घ्यावी. दरपत्रक मंजूर किंवा नामंजूर करण्याचे संपूर्ण अधिकार संचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, नागपूर-अमरावती विभाग, नागपूर यांना आहेत. दरपत्रक मंजूर होताच आपणास कळविण्यात येईल. दरपत्रक संचालक, माहिती व जनसंपर्क कार्यालय, जुने सचिवालय, सिव्हील लाईन्स, नागपूर या पत्यावर पाठवावी.
@ फाईल फोटो