प्रतिबंधीत तंबाखू विक्री करीता वाहतुक करणाऱ्या आरोपींना अटक, एकुण ६,२२,०४५/- रू चा मुद्देमाल जप्त

नागपूर :-दिनांक ०१.११.२०२३ चे २२.१५ वा. सुमारास गुन्हेशाखा युनिट चे अधिकारी व अंमलदार यांना, मिळालेल्या खात्रीशीर माहिती वरून, त्यांनी पोलीस ठाणे मानकापूर हहीत, अय्यपा नगर, श्याम लॉन जवळ, मारोती झुजूकी एरटिगा वाहन के. एम. एन २६ ए के १५९९ या गाडीचा पाठलाग करून गाडीला थांबवुन वाहनाची झडडी घेतली असता वाहनातील आरोपी क. १) असद खान वरद मजीद खान वय ३५ वर्ष रा. श्याम लॉन जवळ, नागपूर २) शोहेब स्माईल शेख वय ३५ वर्ष रा. कुदरत पलाझा अपार्टमेंट, जाफर नगर यांचे ताब्यात शासनाने प्रतीबंधीत केलेला सुंगधीत तंबाखु, व तांबाखु जन्य पदार्थ व वेगवेगळा फ्लेवरचे तंबाखु इत्यादी साहित्य मिळुन आले. आरोपीचे ताब्यातून नमुद मुद्देमाल व एरटिगा गाडी असा एकूण ६,२२,०४५/- रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला..

आरोपीविरुद्ध पोलीस ठाणे मानकापूर येथे कलम १८८, २७२ २७३३२८ भादंवी सहकलम ५९ अन्न व सुरक्षा मानके अधिनीयम अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीला मुदेमालासह मानकापूर पोलीसांचे ताब्यात दिले आहे.

वरील कामगिरी अपर पोलीस आयुक्त गुन्हे शाखा,पोलीस उप-आयुक्त (डिटेक्शन) यांचे मार्गदर्शना खाली पोनि मुकुंद ठाकरे, पोउपनि देवकाते, सफी खोरडे, पांडे पोहवा मुकेश राऊत, प्रविण लांडे, नापोअ अनुप तायवाडे, अमोल जासुद, अनिल बोटरे व मनिष रामटेके, प्रमोद देशभ्रतार यांनी केली.

NewsToday24x7

Next Post

बिहार प्रमाणे राज्यातील इतर मागासवर्गीयांची स्वतंत्र जातीनिहाय जनगणना करावी

Sat Nov 11 , 2023
– राकांपा ओ.बी.सी. सेलचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन नागपूर :- नुकतीच बिहार मध्ये स्वतंत्रपणे जातनिहाय जनगणना पार पडली आहे. तामिळनाडू, छत्तीसगड आणि इतर अनेक राज्यांनी सुद्धा ओबीसी जनगणना केल्या असून त्यांच्या राज्याच्या विकासासाठी त्यांचा उपयोग झालेला आहे. महाराष्ट्रातही जातनिहाय जनगणना करण्याबाबतची गेल्या कित्येक वर्षांपासूनची मागणी प्रलंबित आहे. जनगणना हा विषय केंद्र शासनाशी संबंधित आहे. मात्र इतर मागासवर्गाची स्वतंत्र जनगणना करण्यासाठी केंद्र सरकारने […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com