‘त्या’ रुग्णाचा मृत्यू इन्फ्लुएंझा H3N2 ने नाही

मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल : सर्व शासकीय व खासगी रुग्णालयात H1N1 सोबत H3N2 ची तपासणी करण्याचे निर्देश

नागपूर : लक्ष्मीनगर झोनमधील ७२ वर्षीय रुग्णाचा झालेला मृत्यू हा इन्फ्लुएंझा H3N2 ने झालेला नाही, असा अहवाल इन्फ्लुएंझा H3N2 मृत्यू अन्वेषण समितीने सादर केला आहे, मृत्यू विश्लेषण समितीची बैठक मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत डॉ.निवृत्ती राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक नागपूर डॉ. दीपक सेलोकर, जिल्हाशल्य चिकित्सक मेयो रुग्णालय, डॉ. रविन्द्र खडसे, प्राध्यापक सूक्ष्मजीव शास्त्र विभाग, डॉ. प्रवीण सलामे, सहयोगी प्राध्यापक, औषध वैद्यकशास्त्र विभाग, डॉ. गोवर्धन नवखरे, नोडल वैद्यकीय अधिकारी साथरोग विभाग, मनपा, डॉ. शबनम खान, मुख्य वैद्यकीय अधिकारी, खाजगी रुग्णालय उपस्थित होते.

२ मार्च २०२३ रोजी 72 वर्षीय पुरुष रुग्ण श्वास घेण्यास त्रास, ताप व खोकला होत असल्यामुळे या रुग्णाला दुपारी 4 वाजता रामदासपेठ येथील खाजगी रुग्णालयामध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरु करण्यात आले. या उपचाराने रुग्णाची प्रकृती सामान्य झाल्यामुळे त्यांना सामान्य कक्षात हलविण्यात आले. मात्र ६ मार्च २०२३ रोजी रुग्णाला श्वास घेण्यास परत त्रास होत असल्याने त्यांना पुन्हा अतिदक्षता कक्षात हलविण्यात आले. यासोबतच त्यांचा प्रयोगशाळा नमुना घेऊन प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आला. यामध्ये अनेक जिवाणु व विषाणुचा संसर्ग फुफ्फुसात झाल्याचे निदर्शनास आले. यामध्ये काही जिवाणु हे प्रतिजैविकास प्रतिसाद न देणारे होते. या सर्वांचा परिणाम वाढत जावून दिनांक 9 मार्च, 2023 रोजी रुग्णाचा दुर्देवी मृत्यू झाला.

रूग्णाचा एक्सरे रिपोर्ट, सहव्याधी व अनेक प्रकारचे संसर्ग लक्षात घेता या रुग्णाचा मृत्यू हा H3N2 या संसर्गामुळे झाल्याचे दिसून नाही, असा अभिप्राय मृत्यू विश्लेषण समितीने एकमताने दिला.

मृत्यू विश्लेषण समितीने H3N2 नियंत्रण व उपाययोजना करीता पुढीलप्रमाणे मार्गदर्शन दिले आहे. यामध्ये सर्व खासगी तसेच शासकीय रुग्णालयामधे भरती होणाऱ्या संशयीत रुग्णाचे H1N1 सोबत H3N2 तपासणी करणे, खासगी तसेच शासकीय प्रयोगशाळामध्ये H1N1 व H3N2 ची तपासणी सोय उपलब्ध करणे, शासकीय व खासगी रूग्णालयात संशयीत रुग्णाकरिता विलगीकरण कक्ष तयार ठेवणे, सर्व शासकीय व खासगी रुग्णालयांनी H1N1 व H3N2 रुग्णांची माहिती आरोग्य विभागास नियमितपणे देण्याचे निर्देश दिले.

इन्फ्लुएंझा H3N2 टाळण्याकरीता ही काळजी घ्या

– हात सातत्याने साबण व पाण्याने धुवा

– गर्दीमध्ये जाणे टाळा

– रुग्णापासून किमान ६ फूट दूर रहा

– खोकताना व शिंकताना तोंडाला रुमाल लावा

– भरपूर पाणी प्यावे, पुरेशी झोप घ्यावी

– पौष्टीक आहार घ्या

हे टाळा

– हस्तांदोलन अथवा आलिंगन

– सार्वजनिक ठिकाणी थुंकणे

– डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेणे

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

प्रा. राजाराम वट्टमवार यांच्या नावाने फेलोशिपची सुरुवात, देशातील पत्रकारांच्या मुलांना शिक्षणासाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे महत्त्वपूर्ण पाऊल..!  

Thu Mar 16 , 2023
मुंबई :-  ज्येष्ठ समाजसेवक तथा सेवाभावी युवकांचे आयडॉल असणारे प्रा. राजाराम वट्टमवार सर यांच्या नावाने फेलोशिपची सुरुवात करण्यात आली आहे. शिक्षणात हुशार असून आर्थिकदृष्ट्या सक्षम नाहीत, अशा पत्रकारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी या फेलोशिपचा फायदा होणार आहे. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या केंद्र आणि राज्याच्या बैठकीत प्रा. राजाराम वट्टमवार फेलोशिपच्या पोस्टरचे प्रकाशन करून शुभारंभ झाल्याची घोषणा ‘व्हॉईस ऑफ मीडिया‘चे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com