स्वच्छ भारत अभियान : शोध पथकाची कारवाई

नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने बुधवार (ता.23) 8 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 60 हजार रुपयांचा दंड वसूल केला. लक्ष्मीनगर झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे अल्केश पटेल, नेल्को सोसायटी, सुभाष नगर, नागपूर यांच्यावर रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. धरमपेठ झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. एस.व्ही. पध्ये, रामनगर चौक, नागपूर यांच्यावर माती आणि चिखल टाकून जवळचा रस्ता घाण आणि अस्वच्छ केल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. हनुमान नगर झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. एस.के. असोसिएटस, शक्ती नगर, नागपूर यांच्यावर रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच मे. टेक्नो सॉफ्ट अकॅडमी, बुधवार बाजार, नागपूर यांच्यावर इलेक्ट्रीक पोलवर अनधिकृतपणे बॅनर व होर्डींग लावल्याबाबत 5 हजार दंड वसूल करण्यात आला. सतरंजीपुरा झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. विनय किराणा स्टोर्स, ठक्करग्राम, पाचपावली, नागपूर, यांच्यावर प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. मंगलवारी झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे राजु कलमकर, कोराडी बाजार रोड, नागपूर यांच्यावर प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. मे. इकॉन विला, कोराडी रोड, यांच्यावर रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच मे. समसिध इंन्टरनॅशनल स्कुल, फरस चौक, कोराडी रोड, नागपूर यांच्यावर इलेक्ट्रीक पोलवर अनधिकृतपणे बॅनर व होर्डींग लावल्याबाबत 5 हजार दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जपानमध्ये तिसरा दिवस व्यस्ततेचा, दिवसभराच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत चांद्रयानाच्या यशाचा भारतीयांसोबत आनंद साजरा

Thu Aug 24 , 2023
– वंदे मातरम् आणि भारत माता की जयच्या घोषणांनी निनादला जपान टोकियो :- जपान दौऱ्याच्या आजच्या तिसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक मान्यवरांच्या भेटी घेतल्या आणि दिवसभराच्या घडामोडी संपत असताना भारताने चंद्रावर पाऊल ठेवले, तो क्षण जपानमधील भारतीयांसोबत आनंदाने साजरा केला. वंदे मातरम् आणि भारत माता की जयच्या घोषणांनी आज संपूर्ण जपान निनादले होते. या आनंदाच्या आणि ऐतिहासिक क्षणाला […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com