गुन्हेशाखा, यूनिट क. २ पोलीसांची कामगिरी – वाहन चोरी करणारा आरोपी ताब्यात

नागपूर :- दिनांक, १५.०४.२०२३ चे १६.३० वा. ते १८.३० वा. चे दरम्यान फिर्यादी अश्विनी सुरेश धकाते वय ३१ वर्ष, रा. उज्वल अपार्टमेंट, फ्लॅट नं. ६ राहाटे कॉलोनी, दंतोली, नागपूर यांनी त्यांची सुझुकी अॅक्सेस १२५ गाडी क. एम. एच. ४९ बी. वाय ६५४७ कि.नं. ४०,०००/- रू ची ही पोलीस ठाणे सदर हद्दीत गोंडवाना चौक, वैरामजी टाउन येथील कोटक महेंद्रा बँक येथे पार्किंग मध्ये लॉक करून ठेवली असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांची नमुद सुझुकी अॅक्सेस गाडी चोरून नेले फिर्यादीचे असे रिपोर्ट वरून पोलीस ठाणे सदर येथे कलम ३७९ भादंवी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हेशाखा युनिट क. २ से अधिकारी व अंमलदार यांनी सदर गुन्हयाचे समांतर तपास करीत असता, तांत्रीक माहीतीचे आधारे आणि प्राप्त गोपनीय माहिती प्रमाणे त्यांनी आरोपी नामे सुलतान खान वल्द मौसम खान, वय २८ वर्ष, रा. गोरेवाडा, अब्दुल हमीद नगर, प्लॉट नं. २९, नागपुर. पो. ठाणे मानकापुर यांस तांत्रीक माहीतीव्दारे मोठया शिताफीने ताब्यात घेतले. नमूद आरोपीस अधिक विचारपूस केली असता, त्याने नमूद वाहन चोरी केल्याचे सांगीतले. त्यावरून आरोपीने लपवुन ठेवलेल्या जागेवरून वाहन क. एम. एच. ४९. वि.वाय. ६५४७ सुझुकी अॅसेस १२५ मॉडेल असणारी किंमत अंदाजे १,००,०००/- रु. जप्त करण्यात आले. तसेच आरोपीने पोलीस ठाणे अंबाझरी हदीतून एक अॅक्टीव्हा गाडी चोरी केल्याची कबुली दिली. नमुद आरोपी विरुध्द योग्य त्या पुढील कारवाईस्तव जप्त मुद्देमालासह आरोपीस पो. ठाणे सदर यांचे स्वाधीन करण्यात आले.

सदरची कारवाई पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन), गुन्हे शाखा,  मुम्मका सुदर्शन, सपोआ गुन्हे मनोज सिडाम, यांचे मार्गदर्शनाखाली वपोनि. राहुल शिरे, सपोनि पवार, चांभारे, काळेल, पोहवा. संतोष, रोनाल्डो, राजेश, संतोषसिंह ठाकुर, रामनरेश, आशिष, नापोअ, शेषराव किशोर, महेंद्र, नितेश, सुनिल, शैलेष, कमलेश, प्रविण, बलराम झाडोकार, पराग ढोके, शेखर राघोर्ते, मिथुन नाईक, राहुल शिरे यांनी केली.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com