भाजपा जैन प्रकोष्ठच्या कॅन्सरमुक्त महाराष्ट्र अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याला प्रारंभ

मुंबई :-भारतीय जनता पार्टी प्रदेश जैन प्रकोष्ठच्या कॅन्सरमुक्त महाराष्ट्र अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि अमृता फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी करण्यात आला. जैन अल्पसंख्याक महासंघाचे अध्यक्ष ललित गांधी, जैन प्रकोष्ठचे प्रदेश संयोजक संदीप भंडारी, विकास अच्छा हेही यावेळी उपस्थित होते.

यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे अभियान कौतुकास्पद असून जैन प्रकोष्ठच्या अभियानामागे भाजपाची संपूर्ण संघटना उभी असल्याची ग्वाही दिली. गोरगरीब वर्ग वैद्यकीय उपचारांपासून वंचित राहू नये यासाठी मोदी सरकारने तसेच राज्य सरकारने अनेक योजना सुरु केल्या आहेत. या अभियानाप्रमाणे जनजागृती झाली तर केंद्र व राज्य सरकारच्या अनेक योजना यशस्वी होतील असेही त्यांनी नमूद केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जपानमधील कोयासन विद्यापीठाने मानद डॉक्टरेट जाहीर केल्याबद्दल भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले.

अमृता फडणवीस यांनी सांगितले की, कर्करोग होऊ नये यासाठी नागरिकांनी जीवनशैली बदलण्याची गरज आहे. त्यासाठी जैन प्रकोष्ठ ने प्रबोधन करावे. अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात ५० हजार तपासण्यांचे उद्दिष्ट जैन प्रकोष्ठच्या कार्यकर्त्यांनी पूर्ण करावे, असेही त्यांनी सांगितले. जैन प्रकोष्ठचे प्रदेश संयोजक संदीप भंडारी यांनी सांगितले की, पहिल्या टप्प्यात १७५ तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरांतून २८ हजार लोकांची तपासणी करण्यात आली. या अभियानासाठी सहाय्य करणाऱ्या जश वीरा, गिरीश पारख यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाच्या सहकार्याने हे अभियान राबविण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नवभारत साक्षरता कार्यक्रम सर्वेक्षणावर विमाशि संघाचा बहिष्कार

Tue Aug 22 , 2023
नागपूर :- राज्‍यातील मराठी शाळांचा दर्जा खालावत चालला आहे. शाळांचा दर्जा उंचाविण्यासाठी शिक्षकांना अधिक वेळ द्यावा लागणार आहे. असे असताना त्‍यांना अशैक्षणिक कामे देऊन मराठी शाळा डबघाईस आणण्याचा हा प्रकार आहे. या प्रकारावर विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ तीव्र खंत व्‍यक्‍त करीत असून या सर्व्हेक्षणावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेत असल्‍याचे पत्र आयुक्‍त (शिक्षण), शिक्षण संचालक (योजना) यांना सरकार्यवाह तथा आमदार सुधाकर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com