बेला :- चालावा जगाचा प्रवाह, व्हावा निसर्ग गुणाचा निर्वाह! यासाठी योजिला विवाह, धर्मज्ञानी तयाचा !
असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेच्या 21व्या अध्यायात लिहिले आहे. त्यानुसार नजीकच्या सोनेगाव येथील पार्वता व केशव नान्हे यांची मुलगी रोशनी हिचा विवाह वागदरा गुमगाव येथील बेबी व श्रावण शिवरकर यांचा मुलगा अजय यांच्याशी बेला येथील माऊली सभागृहात नुकताच आगळ्या वेगळ्या पद्धतीने थाटात पार पडला. यावेळी आदिनाथ गुरू माऊली सेवाश्रम, बरबडी चे संस्थापक ब्रम्हमुर्ती शेषानंद पांडे महाराज (भद्रावती) प्रामुख्याने उपस्थित होते.
अध्यायाचे वाचन करून शेषानंद महाराजांनी वधू-वरांसह 51 पाहुणे व वऱ्हाडी मंडळींना ग्रामगीता ग्रंथ भेट दिला. त्यांनी राष्ट्रसंतांच्या विचारांचे मौलिक मार्गदर्शन केले. वधूवरांना शुभ आशीर्वादासह वैवाहिक जीवनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांच्या समवेत गुरूआई मंदा पांडे सुद्धा उपस्थित होत्या.यावेळी स्वाती व विवेक नान्हे यांनी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले. राजु मेघरे,रविन्द्र गाडगे,प्रभाकर राऊत,प्रकाश घवघवे,सुरेश चंदनखेडे,प्रभाकर गुडांळे,अविनाश काटकर,वसंतराव कोरडे, गजानन कुमरे,भगत टेकाम,भारत चाफले,पुजाराम खिरटकर, सुधाकर मंगळे,श्रीमती रामप्यारी चंदेल,.चंदा कोरडे, सुंदर निमसडे,.धोटे,.चाफले,चेनकाबाई,स्वेता कोरडे व अनेक उपासक भक्त उपस्थित होते. आधुनिक विज्ञान व्दारे फेसबुक, ट्युब लाईव्हचे आयोजन ओमप्रकाश पांडे यांनी केले असता मिडीयाव्दारे विवाह सोहळाचे आदिनाथ गुरु माऊली सेवा मंडळाने थेट प्रक्षेपन सादर केले .