चाकू आणि गुप्तीचा धाक दाखवून लुटमार करणारे दोन्ही आरोपी जेरबंद

तहसील पोलिसांनी सापळा रचून १२ तासाचे आत रॉबरीचे अटल गुन्हेगार गजाआड – एकूण . 2,65,900/- रू चा  मुद्देमाल हस्तगत

नागपुर –  गिरणार कार्गो एस्कॉर्ट ऑफीस सिध्दीविनायक बिल्डीगं गांधीबाग नागपूर येथे काम करीत असतांना त्यांचे ऑफीस मध्ये 8 वर्षापुर्वी काम करणारा इसम नामे – राजु उर्फ गौतम भिमराव रामटेके हा त्याचे एका साथीदारासह आला फिर्यादी व त्याचे स्टॉफला चाकू आणि
गुप्ती दाखवून जिवानिशी ठार मारण्याची धमकी देवून फिर्यादी कडून लॉकर खोलून त्यांचे लॉकर मधील रू. 3,25,000/- नगदी रक्कम जबरदस्तीने घेवून गेलेसदर गुन्हयात मोठया शिताफीने व कुशलतेने गुप्त बातमीदाराचे मिळालेल्या माहिती वरून आरोपी नामे 1) राजु
उर्फ गौतम भिमराव रामटेके, वय 33 वर्षे, रा. जुना बगडगंज कार्पोरेशन शाळेच्या मागे, पो.स्टे नंदनवन, नागपूर आणि 2) अशोक किसन पाटील, वय 45 वर्ष , रा.गौतमनगर दुर्गामाता  मंदीर जवळ, पो.स्टे  जरिपटका, नागपूर यांचेकडून 12 तासचे आत गुन्हा उघडकीस आणून नगदी रू. 2,65,550/- हस्तगत करून गुन्हयात वापरलेली लहान तलवार व एक चाकू जप्त करण्यात आला आहे असा एकूण रू. 2,65,900/- मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपी अशोक  किसन पाटील हा रेकॉर्ड वरील गुन्हेगार असून चोरी  व जबरी चोरी असे अनेक जुने गुन्हे दाखल आहेत.

सदरची कारवाई नागपूर शहराचे  पोलीस उपायुक्त(परिमंडळ क्रं. 3) गजानन षिवलिंग राजमाने, सपोआ (कोतवाली  विभाग)  संजय सुर्वे यांचे मार्गदर्शनात पो.स्टे तहसिलचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक  जयेश भांडारकर,पो.नि (गुन्हे)  बबन येडगे  सपोनि  संदीप बागुल, सपोउपनि संजय दुबे, सपोउपनि. राजेश  ठाकूर,सपोउपनि. प्रमोद निवारे,पो  हवा. सुनिल कुसराम, नापोशि प्रशांत  चचाने, पुरूषोत्तम जगनाडे, प्रदीप सोनटक्के, अनंत नान्हे, नजिर शेख, प्रविण लांडगे, नितीन राठाडे , शषवंत डोंगरे, पंकज बागडे, पंकज निकम यांनी केली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

संत्रा मार्केट जन आरोग्य केंद्राचे महापौरांच्या हस्ते उद्घाटन

Tue Mar 1 , 2022
नागपूर, ता. १ : वंदे मातरम जन आरोग्य मिशन अंतर्गत नागपूर महानगरपालिकेतर्फे सुरू करण्यात आलेल्या संत्रा मार्केट येथे सुरू करण्यात आलेल्या ‘जन स्वास्थ्य केंद्राचे’ उदघाटन मंगळवारी (ता. १) महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते पार पडले. या जन आरोग्य केंद्राचे संचालन विदर्भ सेवा समिती करणार आहे. याप्रसंगी महापौर दयाशंकर तिवारी यांच्यासह गांधीबाग झोन सभापती श्रद्धा पाठक, जेष्ठ नगरसेवक ऍड संजय बालपांडे, नगरसेविका […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com