संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठी येथील सामाजीक कार्यकर्ता तसेच उद्योगपती राजेश कुमार शर्मा यांची संयुक्त भारतीय धर्मसंसद च्या महाराष्ट्र प्रदेश संयोजकपदी नुकतीच निवड करण्यात आली.
ही निवड संयुक्त भारतीय धर्मसंसद राष्ट्रीय संयोजक अरुण कुमार मालु यांनी केली. या पदावर निवड झाल्याबद्दल राजेश कुमार शर्मा यांनी राष्ट्रीय अध्यक्ष आचार्य राजेश्वर, राष्ट्रीय संयोजक अरुणकुमार मालु, स्वामी श्रीकरपात्री महाराज, भुवनचंद्र उनियाद, अल्बेली माधुरी शरण , अश्विन पुरोहीत , महंत रामचरणदास महाराज , महंत रविंद्रनाथ योगेश्वर, स्वामी कांताचार्य महाराज , विजय येती महाराज , युवराज स्वामी , बद्री प्रपन्नाचार्य , महंत विनय पाठक , महंत वरुण शर्मा , महंत परशुराम बाबा, चैतन्य स्वामी आदि मान्यवरांचे आभार मानले . उल्लेखनीय आहे की , राजेश शर्मा कामठी शहरात अनेक वर्षापासुन धार्मीक व सामाजीक क्षेत्रात अग्रेसर आहेत. त्यांनी कामठी शहराचे नाव हनुमान जयंतीच्या शोभायात्रेचा धार्मीक कार्यक्रमाच्या माध्यमातुन देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचविले. त्यांनी नेहमीप्रमाणे कामठी शहरात सर्व धर्म समभावाचा एकोपा ठेवत आपला एक ठसा निर्माण केला. त्यांच्या याच कार्यशैलीचा आधारावर महाराष्ट्र प्रदेश प्रभारी संयोजकपदी निवड करण्यात आली. निवड झाल्याबद्दल कामठी शहरातील अनेक मान्यवरांनी राजेशकुमार शर्मा यांचे अभिनंदन केले.