विद्यापीठात ‘सुजोक थेरपी’ विषयावर कार्यशाळा संपन्न

अमरावती :-  संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्यावतीने मंगळवारी दि. 28 मार्च, 2023 रोजी ‘सुजोक थेरपी’ विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेला अमरावती शहरातील प्रसिध्द श्रीहरी सुजोक केंद्राचे संचालक डॉ. आशीष राठी मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. डॉ. राठी यांनी याप्रसंगी सुजोक चिकित्सेबद्दल माहिती दिली. स्माईल मेडिटेशन, कलर थेरपी, सीड्स थेरपी, ट्रायऑक्सीन, मोक्सा, मॅग्नेट्स, मुद्रा अशा विविध विषयांवर डॉ. राठी यांनी मार्गदर्शन करतांना मधुमेह, कर्करोग, वात, सांधेदुखी, मुळव्याध अशा अनेक आजारांवर या चिकित्सा पध्दतीचा सकारात्मक प्रभाव पडत असल्याचे सांगून प्रात्यक्षिक करुन दाखविले

विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून या चिकित्सा पद्धतीचा विद्याथ्र्यांनी अवलंब करावा, असे आवाहन केले. डॉ. अश्विनी राऊत यांनी अतिथींचा परिचय करुन दिला. यावेळी डॉ. आशिष राठी यांचा डॉ. श्रीकांत पाटील यांनी स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला. कार्यक्रमाचे संचालन प्रयोग निस्ताने, तर आभार स्वाती लोखंडे हिने मानले. कार्यशाळेला डॉ. अनघा देशमुख, प्रा. राधिका खडके, प्रा. राहुल दोडके, प्रा. संदीप महल्ले, हरीश धुळे यांच्यासह विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com