राजधानीत सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

नवी दिल्ली, 03  : स्त्रीमुक्ती आंदोलनाच्या महाराष्ट्रातील अग्रणी व भारतातील पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची  जयंती आज महाराष्ट्र सदन  आणि महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली.

             कोपर्निकसमार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त डॉ. निरुपमा डांगे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांच्यासह महाराष्ट्र सदनाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सावित्रीबाई  फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

                                 महाराष्ट्र परिचय केंद्रात सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

                  महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आले. परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी  तथा उपसंचालक (अ.का.) अमरज्योत कौर अरोरा यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी माहिती अधिकारी अंजु निमसरकर, उपसंपादक रितेश भुयार  यांच्यासह  उपस्थित कर्मचा-यांनी  प्रतिमेस  पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

बाबुपेठ येथील मनपा शाळेत सावित्रीबाई फुले जयंती साजरी-जिल्हाधिकारी, महापौर, मुख्य कार्यकारी अधिकारी यांची उपस्थिती

Mon Jan 3 , 2022
चंद्रपूर, ता. ३ : महानगरपालिकेच्या बाबुपेठ येथील सावित्रीबाई फुले शाळेत जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे व महापौर राखी कंचर्लावार यांच्या प्रमुख उपस्थितीत सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम पार पडला. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, आयएमएचे अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, मनपाचे उपायुक्त अशोक गराटे, नगरसेवक प्रदीप किरमे, नगरसेविका ज्योती […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com