यवतमाळ :- येथील जाजू महाविद्यालयात ओम ट्रस्टद्वारा दिग्दर्शक विशाल डहाळे यांनी आयोजित केलेल्या ‘मिस यवतमाळ’ या सौंदर्य स्पर्धेत यवतमाळची भक्ती शशांक दुधे ही अभियांत्रिकीची विद्यार्थिनी द्वितीय क्रमांकाची विजेती ठरली. तिची ‘मिस महाराष्ट्र’ स्पर्धेकरिता निवड करण्यात आली. या स्पर्धेत नागपूर, अमरावती, वाशीम, बुलढाणा आदि जिल्ह्यांतून स्पर्धेक सहभागी झाल्या होत्या. स्पर्धकांनी विविध राऊंड पार पाडले. या सर्व राऊंडमध्ये भक्ती दुधे हिने उत्कृष्ट सादरीकरण केले. तिच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.