नागपूर :- शहर पोलीसांनी पोलीस ठाणे हद्दीत महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये ०६ केसेसमध्ये एकुण ०६ ईसमावर कारवाई करून रु. ७,७४०/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जुगार कायद्यान्वये ०६ केसमध्ये एकुण १८ ईसमावर कारवाई करून रू. १,५२,९७०/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तसेच, वाहतुक शाखा पोलीसांनी मोटार वाहन कायद्यान्वये विविध कलमांखाली एकुण ३,४१० वाहन चालकांवर कारवाई करून एकूण रू. ३,९१,१००/- तडजोड शुल्क वसूल केले आहे.
वरील सर्व मोहीम एकत्रितरित्या नागपूर शहर पोलीसांतर्फे राबविण्यात आल्या असून या पुढेही प्रभावीपणे कारवाई करण्यात येणार आहे. वाहन चालकांनी वाहन चालविताना वाहतुकीचे नियम पाळुन वाहनासंबंधी सर्व कागदपत्रे जवळ बाळगावित असे नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे.