पोलीस ठाणे रामटेक जि. नागपूर ग्रामिण कडुन चोरीचे गुन्हे उघडकिस आणून मुद्देमाल हस्तगत

रामटेक :- पोलीस स्टेशन रामटेक गुन्हा रजि. क्र. ५६६/२०२४ कलम ३०३(२), ३(५) भा.न्या.स. मध्ये दिवसा मोबाईलचे दुकानातुन मोबाईल कि. २९,०००/- रू. चा अज्ञात चोरांनी चोरून नेला होता. सदर गुन्ह्यात तांत्रीक माहीतीचे आधारे माहीती प्राप्त करून आरोपी नामे १) महिला आरोपी २) लोकेशकुमार उर्फ लवी उपेंद्र नागेश वय ३५ वर्ष रा. सुखलीया बापट चौक, ३६३६ वाटर टॅकजवळ, इंदौर (म.प्र.) यांना निष्पन्न करण्यात आले असुन सदर गुन्ह्यात आरोपी क्र. १) महिला आरोपी हिस दि. १८/०८/२०२४ रोजी अटक करून तिचे ताब्यातुन १) सदर गुन्ह्यात चोरी केलेला OPPO F27 Pro+ 5G मोबाईल किंमती २९,०००/- रू. २) सदर आरोपीतांनी बु‌ट्टीबोरी येथून चोरी केलेला VIVO Y2 Pro मोबाईल किंमती २७,९९९/- रू. ३) सदर आरोपीतांनी सावनेर येथुन चोरी केलेला Realme narjo 70x 5g मोबाईल किंमती १३,५००/- रु. व आरोपीतांनी गुन्हा करणेकरीता वापरलेली मरून रंगाची अॅक्टीव्हा गाडी क्र. एम.एच.-३१/ई आर-४६५६ किंमती ५०,०००/- रू. एकुण किंमती १,२०,४९९/- रू. बा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ४) सदर दोन्ही आरोपीतांनी मिळुन पांडुर्णा, मध्यप्रदेश येथुन एस. के. ज्वेलर्स, पांढुर्णा येथुन एक सोन्याची अंगठी चोरी केली असल्याचे कबुली दिली आहे.

सदरची कारवाई हर्ष पोहार, पोलीस अधिक्षक नागपूर ग्रामिण, रमेश धुमाळ, अपर पोलीस अधिक्षक, नागपूर ग्रामिण, रमेश बरकते, उपविभागिय पोलीस अधिकारी, रामटेक विभाग रामटेक यांचे मार्गदर्शनात पोनि प्रशांत काळे, पोउपनि श्रीकांत लांजेवार, पोहवा अमोल इंगोले, पोना प्रफुल रंधई, पोना मंगेश सोनटक्के, पोना सतिश राठोड, पोशि शरद गिते, पोशि धिरज खंते यांनी केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अवैध रेतीची चोरटी वाहतुक करणाऱ्या आरोपीस अटक वाहनासह एकूण ३२,४५,०००/- रूपयाचा मुद्देमाल जप्त

Sat Aug 24 , 2024
वेलतूर :- पोलीस स्टेशन वेलतूर येशील स्टाफ पोलीस स्टेशन वेलतूर हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमीदारांकडुन माहिती मिळाली की, मौजा म्हसली येथे ट्रकद्वारे अवैधरीत्या विनारॉयल्टी रेतीची चोरटी वाहतूक होत आहे. अशा मिळालेल्या विश्वसनिय माहिती वरून नमुद घटनास्थळी नाकाबंदी केली असता स्टाफसह मौजा म्हसली येथे ट्रक क. एम एच ४० सी एन- ७११६ वा चालक आरोपी नामे मोहन हरिसींग वलके वय […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!