स्मार्टफोनमुळे फोटोग्राफीचा व्यवसाय संकटात

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- आजच्या आधुनिक जगातील स्पर्धात्मक वेळेत डिजिटल कॅमेऱ्याच्या प्रवेशानंतर आता सर्वांच्या हाती स्मार्टफोन आल्याने एखाद्या समारंभीय सामाजिक वा राजकीय कार्यक्रमात कॅमेऱ्याने छायाचित्र काढणाऱ्यांची विशेष ओळख होत होती मात्र आता या सर्व कार्यक्रमात स्मार्टफोन च्या आधारे फोटो वा विडिओ काढणाऱ्यांची संख्या बळावली असल्याने आता फोटो काढणाऱ्या त्या ओळ्खप्राप्त असलेल्या फोटोग्राफर संपुष्टात येण्याच्या मार्गावर आला असून तंत्रज्ञानाच्या या बदलाने छायाचित्रकारावर संकट उभारले असून फोटोग्राफीचा व्यवसाय अडचणीत आला आहे.

मागील काही वर्षांपूर्वी एका वेळी छायाचीत्रकाराने फोटो काढल्यानंतर तो फोटो डेव्हलप होऊन हातात येईपर्यंत ग्राहकाला आपल्या फोटोची उत्सुकता राहायची,फोटो डेव्हलप व्हायला कधी कधी पंधरा दिवसाचा कालावधी लागायचा आणि त्यानंतर फोटो त्यास बघावयास मिळत असे.आता मात्र एकीकडे तंत्रज्ञान झपाट्याने बदलत असून दुसरीकडे त्याचा थेट परिणाम छायाचित्रण क्षेत्रावर झाला आहे तर येणाऱ्या काळात अजून मोठ्या प्रमाणात परिणाम होईल असे चित्र निर्माण होत आहे.जस जसा तंत्रज्ञानाचा वापर अधिक होत आहे त्याप्रमानात तो वापर मानवाच्या सोयीचा की जीवघेणा हाही प्रश्न निर्माण होऊ लागला आहे.आपल्या व्यवसायाद्वारे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे छायाचित्रण करणाऱ्याला एकेकाळी छोट्यापासून ते मोठ्या कार्यक्रमात आपले प्रतिबिंब ,छायाचित्र टिपण्यासाठी फोटोग्राफरला बोलावण्याशिवाय पर्याय नव्हता पण गेल्या काही वर्षात त्याची जागा आता स्मार्टफोन ने घेतली असून जवळजवळ सर्व कार्यक्रमात फोटोग्राफर ला आता बोलावणे हद्दपार होत चालले आहे.बरेच छोटेखानी वा खाजगी कार्यक्रम हे स्वतःच्या स्मार्टफोन ने फोटो काढुन आटोपत असतात .तर घरोघरी स्मार्टफोन आल्याने येणाऱ्या काळात हा फोटोग्राफीचा व्यवसाय अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

छायाचित्रण क्षेत्रातील नवनवीन शोध आणि त्याचा मोबाईलमध्ये वापर यामुळे डिजिटल कॅमेऱ्याचे विश्व मागे पडू लागले आहे .आज शहर तसेच ग्रामीण भागात प्रत्येकाच्या हाती मोबाईल दिसू लागला आहे.तर अनेकवेळा आपले पैसे वाचविण्यासाठी आपल्या मोबाईलद्वारे फोटो काढून वेळ मारून नेण्याचा प्रकार हल्ली वाढीस लागला आहे.तसेच फोन एक फायदे अनेक यामुळे स्मार्ट फोनची मोठ्या प्रमाणात क्रेझ वाढली आहे.यामुळे मात्र पारंपारीक फोटोग्राफर ची मागणी आता कमी होत असून लोकं त्यांना विसरत चालले आहेत . वाढदिवस असो वा शाळेतील छोटे कार्यक्रम असो ,महाविद्यालयीम कार्यक्रम असो या सर्व कार्यक्रमात आता फोटोग्राफर चे स्थान सातत्याने कमी होत असुन आता केवळ लग्नासाठी फोटोग्राफर चे बोलावणे होत आहेत तसेच येणाऱ्या काळात कदाचित ते ही बंद होईल याची शक्यता नाकारता येत नाही तर या स्मार्टफोन चा वापर करून कुठल्याची कार्यक्रमात पुढे पुढे होऊन स्वतःच फोटोग्राफर होऊन स्वतःच्या स्मार्टफोन ने फोटो काढणारे फोटोग्राफरची ओळख संपुष्टात आणून त्यांच्या छायाचित्रकारीच्या व्यवसायावर आर्थिक संकट ओढवत आहेत.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com