नागपुर – पोलीस स्टेशन कुहीअंतर्गत मौजा सिल्ली 02 किमी दक्षिण. दिनांक 17/02/22 चे सकाळी 01/30
वा ते 02/00 वा. दर. यातील फिर्यादी व चेकिंग अधिकारी पोलीस निरीक्षक चंद्रकांत मदने हे विभागीय गस्त
दरम्यान समोरून येणारा अशोक लेलॅन्ड कंपनीचा एम.एच. 40 बी.एल. 5511 चा ट्रक ला थांबविले असता
आरोपीने आपल्या टिप्पर मध्ये विनापरवाना 5 ब्रास रेती अवैध्य वाहतुक करतांनी मिळुन आल्याने आरोपीकडुन
05 ब्रास रेती किंमती 25,000/- रू. व टिप्परची किंमती अंदाजे 25,00,000/- रू. असा एकुण
25,25,000/- रू. चा माल जप्त केलासदर
प्रकरणी फिर्यादी सरतर्फे पोलीस अंमलदार अमोल रामाजी झाडे, यांचे तक्रारीवरून
पोलीस स्टेशन कुही येथे आरोपी नामे -महेश माधवराव पंचभाई, वय 25 वर्ष, रा. गांधी वार्ड, वलनी, तापवनी,
जि. भंडारा यास अटक करण्यात आली असुन आरोपीविरूध्द कलम 379 भादवि अंतर्गत गुन्हयाची
नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक देविदास ठमके, पो.स्टे. कुही हे करीत आहेत