नागपूर :- राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाअंतर्गत नागपुर महानगर पालीका येथे दि. ०७/१२/२०२४ पासून १०० दिवसीय क्षरोग शोध मोहिम राबविण्यात येत आहे. सदर मोहिम दिनांक ७ डिसेंबर २०२४ रोजी सुरु झालेली असून दिनांक २४ मार्च जागतिक क्षयरोग दिन २०२५ रोजी संपणार आहे. राज्यस्तरीय वरीष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांकडुन या १०० दिवसीय क्षयरोग मुक्त भारत अभियान आरोग्य निक्क्षय शिबीराला भेट देण्यात आली.
सदर १०० दिवसीय क्षयरोग मुक्त भारत अभियान आरोग्य निक्क्षय शिवीर नागपूर महानगरपालिका आरोग्य विभागाअंतर्गत दि. २०/१२/२०२४ रोजी मैडे नगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, मनपा अंतर्गत आयुष्यमान आरोग्य मंदिर बाबा दिपसिंग नगर मध्ये बौध्द विहार व कुंदनलाल गुप्ता नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र मधिल शांतीदूत बौध्द विहार इंदिरा माता नगर या दोन ठिकाणी आयोजित करण्यात आलेले होते. त्यात राज्यस्तरीय अधिकारी डॉ. संदिप सांगळे, सहसंचालक, आरोग्य सेवा (क्षय व कुष्ठ) पुणे, डॉ. रणदिवे अति. सहसंचालक आरोग्य सेंवा (क्षय व कुष्ठ) पुणे, डॉ. दिपक सेलोकर, वैद्यकिय आरोग्य अधिकारी, म.न.पा., नागपूर, डॉ. शिल्पा जिचकार, शहर क्षयरोग अधिकारी, म.न.पा., नागपूर, डॉ. विपांकर भिवगडे, झोनल वैद्यकिय अधिकारी, आशी नगर झोन, डॉ. सुष्मा यादव, वैद्यकिय अधिकारी, शेंडे नगर युपीएचसी, डॉ. निकोसे, वैद्यकिय अधिकारी, कुंदनलाल गुप्ता नगर युपीएचसी हे सर्वं अधिकारी उपस्थित होते. उत्तम मधुमटके डीपीएस, संगिता शिंगणे, पीपीएम, एस.टी.एस., एस.टी.एल.एस., शैलेद्र मेश्राम टीबीएचव्ही, जीएनएम, एनएम, व आशा स्वयंसेवीका या कार्यक्षेत्रातील उपस्थित होते. सदर १०० दिवसीय क्षयरोग मुक्त भारत अभियान आरोग्य निक्क्षय शिबीराला तेथिल नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. तसेच उपस्थित अधिकाऱ्यांनी आलेल्या मोहिमेचा आढावा घेवुन सदर १०० दिवसीय क्षयरोग मुक्त भारत अभियान आरोग्य निक्क्षय शिबीराला पुढील कार्यासाठी मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या.
१०० दिवसीय क्षयरोग मुक्त भारत अभियान आरोग्य निक्क्षय शिबीराअंतर्गत आतापर्यंत ४३ निक्क्षय शिबीर झालेले आहे. त्याअंतर्गत १४,१५९ जणांची Screening करण्यात आली व त्यातुन २०१४ संशयित क्षयरुग्ण शोधण्यात आले त्यापैकी १८९१ जणांचे एक्सरे व ७८३ धुंकी नमुना तपासणी करण्यात आली व ७० क्षयरुग्ण आढळून आले.