पोलीस स्टेशन बेला :- अंतर्गत मौजा पिपळा १२ कि.मी. पुर्व फिर्यादी हिचे लग्न सन २०१९ मध्ये आरोपी क १) फिर्यादीचा पती नामे योगेश अशोक ढगे याचेसोबत झाले असून आरोपी २) फिर्यादीची सासु नामे-२) ग.नां. लक्ष्मी उर्फ अनुबाई अशोक डगे हे फिर्यादी हिला “तु आपले वडिलाकडुन पाच लाख रूपये नौकरी करिता घेवुन ये” असे म्हणुन तिला शारिरीक व मानसिक त्रास देवून फिर्यादीने आरोपी क ३) राजेन्द्र उर्फ राजु अशोक गेरा. हिंगनघाट हनुमान नगर जि. वर्धा यास समजवन्याकरिता सांगीतले असता त्यांनी फिर्यादीस शिवीगाळ करून दिनांक १२/०३/२०१९ ते २७/०५/२०२३ पावेतो आरोपी १ ते ३ यांनी मिळुन फिर्यादी हिला शारिरीक व मानसिक त्रास दिला.
सदर प्रकरणी फिर्यादी नामे- करिश्मा योगेश ढगे वय २८ वर्षे रा नुमानवाई हिंगनघाट हल्ली मु. पिपळा ता. उमरेड जि.नागपुर यांचे रिपोर्टवरून पोस्टे बेला येथे आरोपी नामे- १) योगेश अशोक ढगे वय ३८ वर्षे २) ग.भा. लक्ष्मीबाई उर्फ अनुबाई अशोक ढगे वय ५८ वर्षे ३) राजेन्द्र उर्फ राजु अशोक मे वय ३२ वर्षे तीन्ही रा. हिंगनघाट हनुमान नगर जि. वर्धा यांचे विरुद्ध कलम ४९८ (अ) ५०४, ५०६, ३४ भादवी अन्वये गुन्हा नोंद केला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पो. हवा. सतेंन्द्र रंगारी पो.स्टे. बेला हे करीत आहे.
@ फाईल फोटो